शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी अखंड वीज हा मूलभूत अधिकार; उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 05:15 IST

वीज कापल्याने शेतकऱ्यांनी केली होती याचिका

खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतीला पाणी देण्यात अडचणी येतात आणि हे घटनेच्या अनुच्छेद १९ अन्वये दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि सौरभ शामशेरी यांच्या खंडपीठाने दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील बेछुरा गावच्या लाभक्षेत्रातील ट्युबवेलचे वीज कनेक्शन कापण्यात आले होते. याविरुद्ध १५ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. वीज खंडित करणे हे बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. यामुळे पिकांना पाणी देता येत नाही व याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडला. १८ फेब्रुवारी २०२० रोजी उच्च न्यायालयाने वीज मंडळास म्हणणे मांडण्यास सांगितले. यावेळी वीज मंडळाने वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनीही हे मान्य केले. मात्र प्रशासन वारंवार वीज कनेक्शन तोडते आणि ट्यूबवेलची कोणतीच देखरेख करत नाही. सर्व शेती ट्युबवेलवर अवलंबून आहे, असे सांगितले.

हा तर मूलभूत हक्कांचा भंगलाभक्षेत्रात शेतीला पाणी देण्यात येणारे अडथळे हे शेतकऱ्यांना घटनेने दिलेल्या अनुच्छेद १९ अन्वये (मुक्त व्यवसायाचे स्वातंत्र्य) या मूलभूत हक्काचा भंग आहे, असे मत व्यक्त केले. शासनाच्या जबाबदार यंत्रणांनी साधारण परिस्थितीत वीज तोडण्यात येणार नाही आणि ट्युबवेलची देखभाल व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.