शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर वालधुनी नदी पात्रात भुयारी गटार पाईप? नदीचे अस्तित्व धोक्यात

By सदानंद नाईक | Updated: February 16, 2026 17:43 IST

महापालिकेकडूनच नदीपात्रात अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन?

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप रस्ते खोदून व वालधुनी नदीच्या पात्रात टाकण्यात येत आहे. या भुयारी गटारीच्या पाईपमुळे नदीचे पात्र अरुंद व उथळ होऊन पावसाळ्यात पुराचा फटका नदी किनारील हजारो नागरिकांना बसण्याची धोका समाजसेवक शिवाजी रगडे यांनी ओळखून महापौर व आयुक्ताना तसे निवेदन दिले आहे.

उल्हासनगराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी पावसाळ्यात विशाल रुप धारण करून किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांचे संसार दरवर्षी उघड्यावर आणत आहे. नदीच्या पुराचा फटका किनाऱ्यावरील नागरिकांना बसू नये म्हणून नदी किनारी संरक्षण भीतीची मागणी होत आहे. तर दुसरीकडे भुयारी गटार योजनेमूळे गटारीचे पाईप थेट वालधुनी पात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या या कामामुळे नदीकाठच्या अनधिकृत बांधकामधारकांना मोकळे रान मिळत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. 

शहरात ४५० कोटीच्या निधीतून शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार पाईप टाकण्यात येत आहे. तसेच वालधुनी नदी पात्रात सांडपाणी गटार पाईपलाईन टाकली जात आहे. हे काम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा विचार न करता पाईप टाकले जात आहेत. असा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. या योजनेमुळे नदीपात्रात जागा तयार होत असल्याने भूमाफियांना अनधिकृत बांधकामे करण्यास पालिकेकडूनच एक प्रकारे संधी दिली जात आहे. असेही रगडे म्हणाले. 

निकृष्ट दर्जाचे काम भुयारी गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पावसाळ्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही पाईपलाईन वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? माननीय उच्च न्यायालयाने नदीपात्रातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाबाबत कडक निर्देश दिले आहेत. मात्र, या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्याही तांत्रिक अभ्यासाशिवाय सुरू असलेले हे काम न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

 आयुक्त आणि महापौरांना निवेदन या गंभीर प्रश्नी स्थानिक नगरसेविका सविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे व महापौर अश्विनी निकम यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लेखी स्वरूपात केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Waldhuni River's Existence Threatened by Underground Sewer Pipes

Web Summary : Underground sewer pipes in the Waldhuni riverbed threaten to narrow the waterway, increasing flood risk. Locals allege substandard work and disregard for environmental regulations, prompting calls for investigation.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर