शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका राबविणार दिवा - शिळ भागातही अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 12:29 IST

दिवा भागातील रखडलेली भुयारी गटार योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत योजनेतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देघोडबंदर पाठोपाठ दिव्यातही भुयारी गटार योजना२३४ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाणे - ठाणे शहरापाठोपाठ आता दिव्यातही केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. दिव्यात भुयारी गटार योजनेचा टप्पा पाच राबविण्यात येणार आहे. जेएनएनयुआरएम अंतर्गत या योजनेसाठी निधी प्राप्त झाला नव्हता. परंतु आता अमृत योजनेतून निधी मिळविण्यात येणार असून यासाठी २३४ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.             शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून ७१ टक्के भागात ही योजना कार्यान्वित होणार आहे. या योजनेचे सुमारे ८५ ते ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. उर्वरित काम हे प्रगतीपथावर असून मार्च २०१८ अखेर ते मार्गी लागेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान घोडबंदर परिसरात व दिवा परिसरात मलनिसारण योजना राबविण्यासाठी सल्लागाराकरवी या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावास केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने ही योजना हाती घेण्यात आली नव्हती. परंतु आता केंद्रशासनाने अमृत अभियनाअंतर्गत भुयारी गटार योजनेचा अंतर्भाव केल्याने, घोडबंदर भागात टप्पा ४ अंतर्गत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी १७९ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामुळे भुयारी गटार योजनेचे काम ८९ टक्के मार्गी लागणार आहे.दिवा शिळ भागातही आता ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेत दिवा पूर्व, पश्चिम, साबे, दातीवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, देसाई, मोठी देसाई, पडले, खिडकाळी, डायघर, कौसा (भाग), सिबली नगर, भोलेनाथ नगर, शिळ, डावले, फडके पाडा, खर्डी आदी भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी, २३४.८१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये केंद्राचा सहभाग ७८.२६ कोटी, राज्य शासनाकडून अनुदान ३९.१४ कोटी आणि ठामपाचा सहभाग हा ११७.४१ कोटींचा असणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त