शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात मामानेच केला चिमुरडीचा खून, मामाला ५ दिवसाची पोलीस कस्टडी

By सदानंद नाईक | Updated: November 22, 2024 17:41 IST

कंस मामाला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी

सदानंद नाईकउल्हासनगर : गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता असलेल्या सव्वा तीन वर्षाच्या चिमूरडीचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाल्यावर शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कारवाईची मागणी केली. मात्र रात्री पोलीस चौकशीत मामा खुनी असल्याचे उघड होऊन न्यायाल्याने त्याला ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनाविली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणाऱ्या सव्वा तीन वर्षाची अलिशा मोदी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना १८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली. आई-वडील व नातेवाईकानी मुलीचा शोध घेतला. मात्र कुठेही मिळून न आल्याने, हिललाईन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. गुरुवारी दुपारी खदान येथे अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह मिळून आल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र दुसरीकडे शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कारवाईची मागणी केली. उत्तरतपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला असून शवविच्छेदना नंतर मुलीच्या मृत्युंचे कारण उघड होणार असे पोलिसांनी सांगितले.

हिललाईन पोलिसांनी तपासा दरम्यान संशय गेलेल्या मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन बोलते केले असता, त्यांने खून केल्याची कबुली दिली. मुलगी अलिशा अंगणात खेळत असताना मुलीला मामा जितू नुपे याने एक थप्पड मारली, ज्यामुळे मुलगी खाली पडून मरण पावली. त्यावेळी घाबरलेला मामा नुपे यांने मुलीचा मृतदेह लपून ठेवत मतदानाच्या दिवशीं मृतदेह खदान येथे ठेवून पुरावा नष्ट करण्यासाठी उद्देशाने मृतदेह जालन्याचा प्रयत्न केला. मुलीचा मुर्तदेह शवविच्छदन करण्यासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरे यांनी दिली. तसेच अटक केलेल्या मामाला न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कंस मामाला फाशीची देण्याची मागणी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी