ठाणे : कशेळी व काल्हेर परिसरातील एमएमआरडीएच्या जमिनीवरील ७५ निवासी इमारती अनधिकृत असल्याचे उघड झाले. यामुळे अनधिकृत इमारती तातडीने सील करण्याची धडक कारवाई ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा प्रशासनाने केली. यासाठी स्वत: जिल्हाधिका-यांनी महसूल अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस फौजफाटा घेऊन ही कारवाई केली.या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते. ‘पर्यावरण संरक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. विशेषत: कशेळी, काल्हेर येथील कांदळवनाचा नाश करून बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. एमएमआरडीए जमिनीवर देखील अतिक्रमणे झाल्याच्या तक्रसरींची दाखल घेऊन हे पाउल उचलले’ असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.आज कारवाई झालेल्या इमारतींचे पंचनामे सुरू आहेत. नव्या शर्तीच्या जागेवर झालेल्या या बांधकामांसाठी ग्रामपंचायत, पालिका किंवा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. या इमारतींपैकी काही पूर्ण झालेल्या निवासी इमारती असून काही इमारतीं अपूर्णावस्थेत असल्याचे प्रांत अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितिले. या अपूर्ण इमारतींचा पंचनामा करण्यात येत आहे. त्यांची कागदपत्रे रीतसर तपासून मग त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई होईल. ज्या इमारती बांधून पूर्ण आहेत, त्या शासन जमा होतील. सध्या भिवंडी पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. या इमारतींमध्ये कुणीही रहात नव्हते, त्यापैकी काही बांधून तयार होत होत्या, तत्पुर्वी ही कारवाई हाती घेण्यात आल्याची माहिती डॉ. थिटे यांनी माहिती दिली. आज दुपारपासूनच ही कारवाई सुरु झाली. यावेळी पोलीस उपायुक्त पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते. याशिवाय उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार संदीप आवारी तसेच त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
भिवंडीच्या कशेळी - काल्हेरमधील एमएमआरडीएच्या जागेवरील अनिधकृत ७५ निवासी इमारती सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:16 IST
या कारवाई दरमयान विशेषत: कांदळवन असलेल्या ठिकाणी झालेल्या बांधकामांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वेळी सील केलेल्या इमारतींच्या विकासकांवर संध्याकाही उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम होते
भिवंडीच्या कशेळी - काल्हेरमधील एमएमआरडीएच्या जागेवरील अनिधकृत ७५ निवासी इमारती सील
ठळक मुद्देठाणे जिल्हाधिका-यांची धडक कारवाईकारवाई झालेल्या इमारतींचे पंचनामे सुरूकुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती