शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे, काशिमीरा येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:36 IST

स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने गुंडांनी दहशत निर्माण करून काशिमीराच्या मांडवीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा बांधकामांचे साम्राज्य उभे केले आहे.

मीरा रोेड - स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने गुंडांनी दहशत निर्माण करून काशिमीराच्या मांडवीपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदा बांधकामांचे साम्राज्य उभे केले आहे. ही बांधकामे तोडून पालिका अधिकारी व संबंधित माफियांवर फौजदारी कारवाईची मागणी जमीन मालक अदिवासी कुटुंबासह मनसेने केली आहे.मांडवी पाडा येथील मौजे काशी सर्वे क्र. ७४/१ब ही सेंट झेवियर्स शाळेमागे चांगुणा बाबर व कुटुंबीयांची जमीन आहे. ही जमीन आदिवासींच्या मालकीची असून सातबारा उताºयावर तशी नोंद आहे. परंतु या ठिकाणी काही भूमाफियांनी दादागिरी व दहशतीने खोट्या करारव्दारे परस्पर जमिनीच्या काही भागाची विक्री त्रयस्थ नागरिकांना करून टाकली आहे. त्या ठिकाणी झोपडीदादांनी बेकायदा झोपड्या व पक्की बांधकामे केली आहेत. याच भागात शिवशक्ती महिला मंडळानेही कब्जा करुन बेकायदा बांधकाम करत कार्यालय थाटले आहे.भूमाफिया व स्थानिक नगरसेवकांच्या संगनमताने महापालिकेने येथे पंतप्रधान आवास योजनेखाली घरांचे क्रमांक टाकले आहेत. कराची आकारणी करत बेकायदा वीजपुरवठाही रिलायन्स एनर्जीने केला आहे.या बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करुन सर्वांवर एमआरटीपीसह अन्य संबंधित कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी चागुणा बाबर यांनी महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेऊन केली आहे.भाजपा नगरसेवकाचा आशीर्वादआदिवासी मालकीची जमीन असून बेकायदा बांधकामे ही स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या आशीर्वादाने झाली असून पालिका नियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी मनसेचे प्रमोद देठे यांनी केली आहे.ही बांधकामे जमीनदोस्त करून बेजबाबदार पालिका अधिकारी, रिलायन्स एनर्जी तसेच झोपडीदादांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे देठे म्हणाले .

टॅग्स :thaneठाणे