शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 03:09 IST

औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवरील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे.

डोंबिवली : औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवरील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यामुळे डोंबिवलीतील महामंडळाचे अधिकारी आता जागे झाले असून त्यांनी ३०० बेकायदा बांधकामांना नोटिसा पाठवल्या आहेत. ही बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी १८ मे पासून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.डोंबिवली औद्योगिक वसाहतीत कारखाने तसेच निवासी विभाग आहे. ४७० पेक्षा जास्त कारखाने औद्योगिक वसाहतीच्या दोन टप्प्यांत विभागलेले आहेत. आजदे, सोनारपाडा, सागाव, चोळे, गजबंधन, गोळवली, पाथर्ली येथे आधी चाळी उभ्या राहिल्या. नंतर त्याचे रूपांतर बहुमजली इमारतींमध्ये झाले. मंडळाने गावठाणातील संपादित केलेल्या जागांवर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. त्यांची बेकायदा नोंदणी झाली आहे. आरसीसी इमारती नियम न पाळता घाईने उभारल्या जात आहेत, हे महामंडळाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. महामंडळाने या आदेशानंतर ३०० बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. मानपाडा चौक ते शिवाजी उद्योगनगर, शिवम हॉस्पिटल ते जिमखाना रोड, आजदे, सागर्ली येथे ही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. तर काही बांधकामे सुरू आहेत. बांधकामधारकांनी स्वत: ही बांधकामे पाडावीत. अन्यथा, पोलीस बंदोबस्तात ती पाडण्यात येतील, असे एमआयडीसीने बजावलेल्या नोटिसांमध्ये म्हटले आहे.वसंत पाटील, मनोज खंडेलवाल, मोहन पाटील, बळीराम पाटील, हेमंत दरे, चंद्रकांत साळवे यांच्या बेकायदा बांधकामांवर १८ मे पासून प्रथम हातोडा चालवला जाणार आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर महामंडळास कारवाई करण्याची जाग आली आहे. यापूर्वी महामंडळाने बेकायदा बांधकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई केलेली नाही.आजदे, सागाव, सांगर्ली, सोनारपाडा या गावांतील काही भाग हा महामंडळाच्या हद्दीत येतो. २७ गावे सध्या महापालिकेत असली, तरी १० गावांचे नियोजन एमएमआरडीएकडे तर उर्वरित १७ गावांचे नियोजन महापालिकेकडे आहे. काही गावे एमआयडीसीला लागून असल्याने त्यांच्याकडे त्याचे नियोजन प्राधिकरण आहे.>२७ गावांमधील बांधकामांवर हातोडा कधी?महामंडळ हाती घेत असलेली ही कारवाई मोठी असणार आहे. मात्र, २७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी अर्थात २०१५ पूर्वी तेथे ८० हजार बेकायदा बांधकामे होती, असे प्रकटन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. गावे समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली तरी ही बेकायदा बांधकामे पाडण्याची कोणतीही मोहीम महापालिकेने हाती घेतली नाही. बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी साधनसामग्री नाही. त्यामुळे त्याची खरेदी करणे व मनुष्यबळ उभारणे, यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली आहे. त्यासाठी निविदा मागवण्याची कार्यवाही अर्थसंकल्पास मंजुरी देऊन एक महिना उलटला तरी केलेली नाही.