शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तहसिलदारांमुळे अनाधिकृत बांधकांमाना बसला चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:14 IST

शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकामे सुरू असुन ठिकठिकाणी बेकायदा निवासी वापराच्या इमारती बरोबर गोदामे, दुकाने, यंत्रमाग कारखाने अशी विविध बांधकामे सुरू...

भिवंडी  : शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकामे सुरू असुन ठिकठिकाणी बेकायदा निवासी वापराच्या इमारती बरोबर गोदामे, दुकाने, यंत्रमाग कारखाने अशी विविध बांधकामे सुरू असुन त्यामधून ग्राहकांची मोठ्या संख्येने फसवणूक होत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहे.त्यास पायबंद घालण्याच्या हेतूने तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी स्थानिक सह दुय्यम अधिका-यांना आदेश बजावीत खरेदी अथवा विक्रीचा देकार नोंदणी करू नये,असा आदेश दिला आहे.

शहर आणि ग्रामिण भागातील अनेक बांधकाम व्यावसायीक इमारती बांधताना स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडून ( महारेरा ) आवश्यक परवानगी अथवा परवानगी क्र मांक घेतल्याचे दिसून येत नाही.असे असताना शहरात तहसिल कार्यालय,अशोकनगर व अंजूरफाटा या ठिकाणी असलेल्या तीन दुय्यम निबंधकांच्या कार्यालयांतून सर्रासपणे विविध स्थावर मिळकतींची रजीस्ट्रेशन केली जात होती.शहरातील काही विकासकांनी प्रत्यक्ष इमारत न बांधता कागदांवर इमारती बांधून रजीस्ट्रेशन करून ते विकासक लोकांचे पैसे घेऊन पळून गेले आहेत.तर काहींनी सरकारी जागेवर बांधकामे करून ती लोकांना विकल्याच्या घटना घडल्या आहेत.अशा फसवणूकी प्रकरणी भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयांत केसेस सुरू आहेत.

तर ग्रामिण भागात सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी,लेआउट परवानगी,मंजूर नकाशे न करता अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणात उभारली जात आहेत.अशा बांधकामांना पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर व प्रांत अधिकारी संतोष थिटे यांच्या सुचनेवरून तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी देकार नोंदणी न करण्याचे आदेश या सह दुय्यम निबंधकांना दिले आहेत.या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील आदेशात देण्यात आल्याने नियमीत रजीस्ट्रेशन करणाºया दलालांमध्ये व विकासकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.्न