शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अ‍ॅटलान्टिसच्या विकासकाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:52 IST

नवी मुंबईतील घणसोलीच्या अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासक कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईतील घणसोलीच्या अ‍ॅटलान्टिस टॉवरच्या विकासक कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी हा टॉवरच एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ (१)नुसार अनधिकृत ठरविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर पालिकेच्याच तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे नवी मुंबई महापालिकेचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हा टॉवर अनधिकृत ठरवून त्यामधील घरे आणि दुकाने खरेदी करूनयेत, असे आवाहन आयुक्तांनी २९ नोव्हेंबर रोजी केले होते. तसेच याबाबत स्थनिक रबाळे पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये तक्रार केली. आता रबाळे पोलिसांनी बी अ‍ॅण्ड एम बिल्डकॉनविरोधात गुन्हा दाखल केला.‘लोकमत’ने याबाबत ३० नोव्हेंबर २०१८ रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने त्याच दिवशी ऐरोली येथील दुय्यम निंबधकांना पत्र लिहून येथील सदनिका अणि दुकानांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करू नये, असे बजावले होते. तसेच बी अ‍ॅण्ड एम बिल्डकॉन कंपनीने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणू नये म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त अमरीश पत्निगिरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबत संबधित विभागास कळविले होते. गुन्हा दाखल झाल्याने कंपनीच्या संचालकांची चौकशी करण्यात येणार आहे.या टॉवरच्या अतिरिक्त चटईक्षेत्राबाबत घणसोलीतील एक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी २०१६ पासून २०१८ पर्यंत तक्रारीही केल्या होत्या. मात्र, तरीही या टॉवरला बिनदिक्कत ओसी देऊन तेथील लोकांची फसवणूक करण्यात विकासकास हातभार लावला. आता त्यांचीही पोलीस चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या टॉवरच्या संररचना तज्ज्ञांसह वास्तुविशारदांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.