शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या तरुणाची आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 01:11 IST

ठाण्यात औषधोपचारासाठी आलेल्या आकाश चंद्रकांत होळकर (२४) या तरुणाने ठाणे रेल्वेस्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.

ठाणे : वडिलांसोबत ठाण्यात औषधोपचारासाठी आलेल्या आकाश चंद्रकांत होळकर (२४) या तरुणाने ठाणे रेल्वेस्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. लोकल थांबवून त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.उल्हासनगर येथील आकाश हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्यावर ठाण्यात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी तो वडिलांसोबत औषधोपचारासाठी ठाण्यात आला होता. त्यानंतर, ते दोघे सकाळी ११.३५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातून घरी परतीच्या प्रवासासाठी ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे लोकलची वाट पाहत बसले होते. कल्याण ही लोकल फलाटावर आली असताना त्यावेळी आकाशने अचानक उठून तिच्याकडे पाहू लागला.ती फलाटावर लागल्यावर त्याने स्वत:ला झोकून दिले. लोकलची धडक लागून तो रुळांच्या मधोमध पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला.रेल्वे प्रशासनाने लोकल उभी करून कर्मचारी आणि हमाल यांच्या मदतीने त्याला लोकलखालून तातडीने काढून प्रथमोपचार करून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले.>गुन्हा दाखलतेथील डॉक्टरांनी त्याला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने काहीकाळ रेल्वेस्थानक परिसरात खळबळ उडाली.