शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

उल्हासनगरच्या भाजी मंडयांना लागली घरघर

By admin | Updated: January 2, 2017 03:50 IST

निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

निवडणुका तोंडावर आल्याने उल्हासनगर स्मार्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याच्या, विकासाचे पॅकेज देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात तशी आश्वासने दिली जातीलही. पण अस्तित्वात असलेल्या सुविधांकडे प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर त्यांची कशी दुरवस्था होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे उल्हासनगरच्या भाजी मंडया. पालिका पथकांचे दुर्लक्ष, विक्रेत्यांनी फिरवलेली पाठ यामुळे या मंडया ओसाड पडल्या आहेत. त्यांच्या अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. 'उल्हासनगर महापालिकेने १९९० ते ९५ दरम्यान कॅम्पनुसार भाजी मंडया बांधल्या. सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात आणि सोयीच्या ठिकाणी भाजी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व मंडया अखेरच्या घटका मोजत आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारती आज धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी भाजीविक्रेते बसण्यास धजत नाहीत. आज या भाजी मंडयांसमोरच भाजीपाल्याच्या बेकायदा गाड्या उभ्या राहत आहेत. यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मार्केटची भाडेवसुली पालिकेऐवजी गावगुंड करीत आहेत. या मंडयांमध्ये साफसफाईच केली जात नसल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. उघड्यावर फेकलेला भाजीपाल्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या इमारतींची पालिकेने दुरुस्तीच केली नसल्याने त्या धोकादायक अवस्थेत आल्या आहेत. त्या केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुरवस्थेमुळे इमारतींना गळती लागली आहे. अतिधोकादायक झालेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणातील बाधित व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजी मंडईचे अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कॅम्प नं.-३ येथील एकेकाळचे सुसज्ज इंदिरा गांधी भाजी व मटण मार्केट अतिधोकादायक झाले आहे. मंडईला चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडूनही कारवाई झालेली नाही. मटण मार्केटचीही दुरवस्था झाली आहे. तसेच उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ बांधलेले मच्छी मार्केट १५ वर्षांपासून वापराविना पडून आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी त्या जागी सुसज्ज मार्केट बांधण्याची संकल्पना मांडली होती. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही या मार्केटची पाहणी करून त्याजागी नवे मार्केट बांधण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मासेविक्रेते रस्त्यावरच बसून व्यवसाय करत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे.