शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

उल्हासनगरची लोकसंख्या घनतेत मुंबईहूनही अधिक

By admin | Updated: January 3, 2017 05:40 IST

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र

नारायण जाधव, ठाणेराज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघू उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराने यावर कडी केली आहे. २०११ च्या जनगणणेनुसार उल्हासनगरची लोकसंख्येची घनता मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजारांहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमिटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरसकिलोमिटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी. देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११ च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख ६ हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरारचा नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येचा वृद्धीचा स्थीर असला तरी २००१-११ च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखाहून कमी झालेली आहे. तो नजिकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढला आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे एमएमआरडीएने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे.मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण सकल लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशातील एकूण ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रातील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर उर्वरित सात महापालिकांचा वाटा ३२.०७ टक्के इतका आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महापालिका दहा लाखाहून लोकसंख्येच्या आहेत. उर्वरित तीन महापालिकाही लवकरच दहा लाखांच्या होतील, असा अंदाज आहे.