शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत

By admin | Updated: January 29, 2017 03:14 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या चार नगरसेवकांसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्व ७८ जागा लढवणार असून

उल्हासनगर : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या चार नगरसेवकांसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्व ७८ जागा लढवणार असून महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा शिंदे यांनी केला. उल्हासनगरात एकीकडे भाजपा, ओमी कलानी टीम व रिपाइंची आघाडी तयार झाली. तर, दुसरीकडे शिवसेनेने महायुती बनवण्याचा निर्धार केला आहे. निवडणूक प्रचारात आघाडी घेऊन इतर पक्षांच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सेक्शन येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी एकूण २९७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी काँगे्रस पक्षाच्या नगरसेविका मीना सोंडे, रिपाइंच्या गटनेत्या पुष्पा बागुल, साई पक्षाचे नगरसेवक अंकुश म्हस्के, अपक्ष नगरसेवक विजय पाटील, माजी नगरसेवक किशोर वनवारी, कैलास तेजी, रिपाइं आठवले गटाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षात प्रवेश केला.ओमी कलानी टीममधील हरी कनोजिया, इंदर गोपलानी, जितू चैनानी आदींसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्वच्या सर्व ७८ जागा लढणार असून स्वच्छ व सुुंदर शहर करण्याचा वचननामा प्रसिद्ध करणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. रिपाइंच्या इतर गटांसोबत चर्चा सुरू असून २ फेबु्रवारीपूर्वी पक्षाची अधिकृत यादी प्रसिद्ध करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी साई पक्षासोबत बोलणी सुरू असल्याचे संकेत दिले.(प्रतिनिधी)