शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:12 IST

पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.

उल्हासनगर : शहराला पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शहर विकासाला चालना मिळणार असल्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. हे गृहीत धरून व्यापा-यांनी कधी नव्हे तो भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, सत्तेच्या एका वर्षानंतर शहरातील विकासकामे ठप्प पडली असून राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला.तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या कालावधीत अडीच वर्षांपूर्वी अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणावेळी अंशत: बाधित व्यापाºयांना दोन मजली बांधकाम, तर पूर्णत: बाधित व्यापा-यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी दिले. मात्र, यापैकी कुठलेही आश्वासन महापालिका व राजकीय नेत्यांनी पूर्ण केले नाही.शहरातील जीन्स उद्योग बंद पडल्याने या उद्योगावर अवलंबून असलेले २५ हजारांपेक्षा अधिक कामगार बेकार झाले. त्यांच्यावर स्थलांतरित होण्याची वेळी आली असून जीन्स कारखाने भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर यासह ग्रामीण भागांत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडून अनेक जीन्सची दुकाने बंद झाली आहेत. अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याची कामे रखडली आहेत. दोनशेपेक्षा जास्त पूर्णत: बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा दिली नसल्याने त्यांचे व्यवसाय बुडीत निघून उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या मुलांनी शिक्षण सोडून नोकरी पत्करली आहे.पूर्ववैभवासाठी व्यापारी आक्रमक-शहराचे पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी देवाला साकडे घालण्याची वेळ व्यापारी संघटनेवर आली. गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नगरसेवकांकडून असहकार्याच्या धोरणामुळे शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली होती. आयुक्तांच्या प्रतिक्रियेला सुमित चक्रवती यांनी पाठिंबा दिला असून शहराच्या विकासासाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी हाजीमलंगबाबाला चादर चढवली आहे.चक्रवर्ती ओमी टीम समर्थकसुमित चक्रवर्ती ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी यांनी आयुक्तांच्या विविध कामांची स्तुती केली आहे. अशावेळी चक्रवर्ती यांनी महापालिकेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून चक्रवर्ती यांच्याआड ओमी आयुक्तांवर निशाणा साधत तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर