शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

‘उल्हासनगर होणार गुन्हेगारमुक्त’

By admin | Updated: February 15, 2017 04:39 IST

आधीच्याच वचननाम्यातील अनेक योजनांसह नव्या भरपूर घोषणांचा वर्षाव करणारा शिवसेनेचा वचननामा मंगळवारी प्रसिद्ध झाला.

उल्हासनगर : आधीच्याच वचननाम्यातील अनेक योजनांसह नव्या भरपूर घोषणांचा वर्षाव करणारा शिवसेनेचा वचननामा मंगळवारी प्रसिद्ध झाला. उल्हासनगरला दहशतवाद व गुन्हेगारमुक्त करण्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे साकडे खा. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घातले.शिवसेना व भाजपाचा वचननामा वेगळा असला, तरी बहुंताश मुद्दे एकच आहेत. भाजपाने वचननामा प्रसिध्द करण्यात बाजी मारली असली, तरी त्यात फारसे नवे मुद्दे नसल्याची टीका सुरू आहे. गेली दहा वर्षे पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. त्यानंतरही मूलभूत प्रश्न सोडवण्याची आश्वासने दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात आहेत.वचननाम्यातील वैशिष्ट्ये वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत, गृहसंकुलांना कर सवलत, धोकादायक इमारतीचे पुनर्वसन, क्लस्टर योजना लागू करणे, विकास आराखड्याला मंजुरी, मुंबईच्या धर्तीवर पुनर्वसन, अद्ययावत व्यापारी संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, रेल्वे स्टेशन परिसरात सॅटीस प्रकल्प, वालधुनी नदीवर पूल, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून अनेक योजना पूर्ण करण्याचे आश्वासन, डम्पिंग ग्राऊंड, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, मुबलक पाणी, अद्ययावत नाट्यगृह यांचा समावेश आहे.जुन्या वचननाम्याला रंगरंगोटीशिवसेनेने २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीतील वचननामाच पुन्हा प्रसिध्द केला की काय, असा प्रश्न पडण्याइतक्या योजना, कामांचा त्यात समावेश आहे.दहशतवादमुक्तीची हाक भाजप व ओमी कलानी टीम एकत्र येताच शिवसेनेने दहशतवाद व गुन्हेगारमुक्त शहराची हाक दिली. (प्रतिनिधी)