शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील मतमोजणी होणार उल्हासनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:19 IST

मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तिथेच असणार आहे.

कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील मतदान ३४६ केंद्रांवर होणार असले, तरी या मतदारसंघाचाच भाग असलेल्या उल्हासनगरमधील व्हीटीसी ग्राउंड येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेच्या साहित्याचे वाटप तेथेच होणार आहे. मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तिथेच असणार आहे.कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात कल्याण पूर्वचा भाग, अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग, नेवाळीनाका या परिसरातील काही गावांसह उल्हासनगरमधील पाच प्रभाग मोडतात. या मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पूर्वेतील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात उघडण्यात आले आहे. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रियेची माहिती दिली.उमेदवारी अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे, अर्जांची माघार आदी प्रक्रिया ‘ड’ प्रभाग कार्यालयात होणार आहेत. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जांचे वितरण आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. ५ आॅक्टोबरला अर्जांची छाननी, ७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. २१ आॅक्टोबरला ३४६ केंद्रांवर मतदान होणार आहे. तर, २४ आॅक्टोबरला मतमोजणी उल्हानगरमधील व्हीटीसी ग्राउंडवरील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल.कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात तीन लाख ४४ हजार ३६९ मतदार असून, त्यात २०८ दिव्यांग मतदार आहेत. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. मतदान प्रक्रियेतील सर्व परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे मिळणार आहे. या मतदारसंघात निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी एक हजार ९०० अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती भांडे-पाटील यांनी दिली.अत्रे रंगमंदिरात प्रशिक्षण : २७ सप्टेंबर आणि १० आॅक्टोबरला दोन सत्रांत पूर्व मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिरात होणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुसरे सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019