शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागेना? अनेकांची नावे चर्चेत

By सदानंद नाईक | Updated: October 9, 2024 17:52 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुखासह कार्यकारणी बरखास्तीला तीन महिनें उलटूनही नवीन शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागत नसल्याने शिंदेंसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र पुढील आठवड्यात शहरप्रमुखासह कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर - उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुखासह कार्यकारणी बरखास्तीला तीन महिनें उलटूनही नवीन शहरप्रमुखाच्या निवडीला मुहूर्त लागत नसल्याने शिंदेंसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र पुढील आठवड्यात शहरप्रमुखासह कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले आहे.

उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना पदाधिकाऱ्यात बदल व चैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहराच्या शहरप्रमुखासह कार्यकारणी गेल्या तीन महिन्यांपूर्वी बरखास्त केल्या आहेत. नव्या शहरप्रमुख व कार्यकारणीसाठी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे आदींच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून दोन्ही शहराचे शहरप्रमुख व कार्यकारणी निवड घोषित केली नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असून शहराची भागदौड सोपविण्यासाठी शहरप्रमुख व कार्यकारणी निवड करण्याची मागणी दबक्या आवाजात पक्षातून होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना याबाबत विचारले असता, पुढील आठवड्यात दोन्ही शहराचे शहरप्रमुख व कार्यकारणी तसेच महिला आघाडी प्रमुख व कार्यकारणी घोषित करण्याचे संकेत दिले.

उल्हासनगर शहरप्रमुख पदासाठी राजेंद्र चौधरी, नाना बागुल, रमेश चव्हाण, राजेंद्रसिंग भुल्लर, बाळा श्रीखंडे, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, स्वप्नील बागुल आदींच्या नावाची चर्चा होत आहे. राजेंद्र चौधरी यांनी पक्षाकडे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून त्यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी निवड होण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखांची जबाबदारीही राजेंद्र चौधरी यांच्याकडे आहे. महिला आघाडी प्रमुख पदासाठीही असंख्य महिला पदाधिकार्यांची नावे चर्चेत असून नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. शहरप्रमुख पदाची माळ आपल्याच गळ्यात पडण्यासाठी अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्याकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे