शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या भरवस्तीत शिरला बिबट्या, वन विभागाने सहा तासांनंतर केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:06 IST

कॅम्प नं-५, भाटिया चौकातील एका बंगल्यात रविवारी सकाळी ८ वाजता बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी बिबट्या आल्याची माहिती हिललाइन पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौकातील एका बंगल्यात रविवारी सकाळी ८ वाजता बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी बिबट्या आल्याची माहिती हिललाइन पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणे वन विभागाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन तब्बल ६ तासांनी बिबट्याला जेरबंद केले.उल्हासनगर कॅम्प नं-५ भाटिया चौकातील भरवस्तीच्या ठिकाणी बिबट्या आल्याची माहिती गंगोत्री व माधव बगाडे यांना नागरिकांनी दिली. त्यांनाही बिबट्या आला यावर विश्वास बसला नाही. त्यांनी काही इमारतींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची शहानिशा केली असता बिबट्या अनेक इमारतीच्या आवारातून जाऊन एका बंगल्यात घुसला असल्याचे दिसला. गंगोत्री यांनी त्वरित हिललाइन पोलीस ठाण्याला माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बंगल्यातील नागरिकांना गंगोत्री यांनी सहकाºयांच्या मदतीने बाहेर काढले. सकाळी ९ नंतर परिसरात बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांमुळे जत्रेचे स्वरूप आले होते.बिबट्या ज्या बंगल्यात शिरला होता तेथील गेट पोलिसांनी बाहेरून बंद करून नागरिकांना येण्याजाण्याचा मार्ग बंद केला. दुपारी १ नंतर ठाणे वन विभागाचे शीघ्र कृती दलाचे जवान आल्यावर पथकाच्या जवानांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी बंगल्याच्या आत मातीच्या जागी बिबट्याचे ठसे त्यांना मिळाले होते.बिबट्या आत असल्याची खात्री झाल्यावर मागील भिंतीला भगदाड पाडून बिबट्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. सहा तासांनंतर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.>बिबट्या भरवस्तीत आलाच कसा?उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर आहे. १३ किलोमीटर क्षेत्रफळात तब्बल ९ ते १० लाख लोकसंख्या असून मोकळे भूखंड अत्यंत कमी आहे. अशा दाटवस्तीच्या ठिकाणी बिबट्या आलाच कसा? असा प्रश्न सामान्य नागरिकांसह पोलीस व वन विभागाला पडला आहे. बिबट्या ज्या बंगल्यात घुसला होता त्याच विभागात म्हशींचा गोठा आहे. म्हशींसाठी सकाळी जंगलातून गवत आणले जाते. गवताच्या ट्रकमध्ये बिबट्या आला असावा असा अंदाज बांधला जात आहे.