शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पॅटर्नमुळे २ हजार कोटींचा फायदा!

By admin | Updated: December 3, 2015 00:47 IST

शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्याच्या शासन अध्यादेशाची अंमलबजाणी होणार आहे. त्यामुळे हजारो जणांची घरे नियमित होणार असून पालिकेला २ हजार कोटी मिळणार

उल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्याच्या शासन अध्यादेशाची अंमलबजाणी होणार आहे. त्यामुळे हजारो जणांची घरे नियमित होणार असून पालिकेला २ हजार कोटी मिळणार असल्याची शक्यता तज्ज्ञासह नगरररचना विभाग व पालिका आयुक्तांनी व्यक्त केली. शहरातील अवैध बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने अध्यादेश क्र -१/२००६ अन्वये अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला होता. उल्हासनगर पॅटर्नची मागणी राज्यभर होत असताना अध्यादेश अंमलबजावणीत विविध अडचणी येऊ लागल्या. यावर मात करीत तत्कालीन नगररचनाकार अरुण गुडगुडे यांनी २२ हजार प्रस्ताव नियमाधीन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यापैकी १०० बांधकामे नियमित होऊन १० कोटींचे उत्पन्न मिळाले. तसेच बांधकाम परवान्यापासून दरमहा १० कोटींचे उत्पन्न मिळत होते. महापालिकेकडे अवैध व वैध बांधकामांची यादी नसल्याने सरसकट १ लाख ५० हजार १७ मिळकतधारकांना नोटिसा देऊन बांधकामे नियमित करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली. पालिकेकडे आलेल्या २२ हजार प्रस्तावांच्या अर्जांची छाननी करून ६ हजार ५२६ प्रस्ताव अंतिम केले. यापैकी २००१ प्रस्ताव नियमित करण्यासाठी मंजूर केले होते.बांधकामे नियमित करण्यासाठी आकारलेला दंड जादा असल्याने, २००१ पैकी १०० जणांनी दंडात्मक रक्कम भरून बांधकामे नियमित केली आहेत. यापोटी पालिकेला १० कोटी ६४ लाख ९६ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच ९८ बांधकामांना पालिका नगरविकास विभागाने डी फॉर्म दिले आहे. ुपण हे अध्यादेशाचे काम तत्कालीन नगररचनाकार गुडगुडे यांच्यानंतर ठप्प पडले आहे. दरम्यान, महापालिकेने शहर विकास आराखड्याला मंजुरी दिली. तसेच अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविला असला तरी तो तेथे धूळखात पडला आहे. असे असले तरी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे काम मनावर घेतल्याने पुन्हा हक्काच्या घराचे स्वप्न सामान्य नागरिकांना दिसू लागले आहे. अध्यादेशाचे काम मार्गी लागल्यास पालिकेला २ हजार कोटी मिळणार असल्याचे संकेतही तज्ज्ञांसह पालिका आयुक्त व नगररचनाकार विभागाने दिले आहे. - बांधकामे नियमित करण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली. पालिकेकडे आलेल्या २२ हजार प्रस्तावांच्या अर्जांची छाननी तज्ज्ञ समितीने करून ६ हजार ५२६ प्रस्ताव अंतिम केले. यापैकी ३ हजार ७७८ प्रस्ताव नगर भूमापन कार्यालयाकडे जमीन मोजणीसाठी पाठवून २००१ प्रस्ताव नियमित करण्यासाठी मंजूर केले होते.- बांधकामे नियमित करण्यासाठी आकारलेला दंड जादा असल्याने, २००१ पैकी १०० जणांनी दंडात्मक रक्कम भरून बांधकामे नियमित केली आहेत.