उल्हासनगरात थरार, कोयता,चाकूने भररस्त्यात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:37 PM2020-05-31T16:37:46+5:302020-05-31T16:37:59+5:30

उल्हासनगर कॅम्प नं -३ खन्ना कंपाऊंड येथे राहणाऱ्या वेदप्रकाश उर्फ गोलू याचा राकेश नावाच्या मुला सोबत शुक्रवारी रात्री ११ वाजता वाद झाला.

In Ulhasnagar, one was stabbed to death with a machete and a knife | उल्हासनगरात थरार, कोयता,चाकूने भररस्त्यात एकाचा खून

उल्हासनगरात थरार, कोयता,चाकूने भररस्त्यात एकाचा खून

googlenewsNext

उल्हासनगर : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावर ६ जणाचा टोळक्याने क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री ११ वाजता वेदप्रकाश उर्फ गोलू याचा कोयता, चाकू आदी शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं -३ खन्ना कंपाऊंड येथे राहणाऱ्या वेदप्रकाश उर्फ गोलू याचा राकेश नावाच्या मुला सोबत शुक्रवारी रात्री ११ वाजता वाद झाला. या वादाचा राग येवून विनोद मगरे, समीर शेख, दीपक शिंदे, रवी खांडेकर, रवी वाघ व दीपक सुरडकर आदींनी कोयता, चाकू असे धारदार शस्त्र घेऊन वेदप्रकाश याच्या मागे धावले. विठ्ठलवाडी रेल्वे रस्त्यावर गाठून वेदप्रकाश यांच्यावर शस्त्रांनी त्यांनी वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या वेदप्रकाश याला नातेवाईक व पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र तब्येत गंभीर असल्याने, शहरातील मिरा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर ठाणे येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आय व्ही कोकरे यांनी दिली आहे.

 मध्यवर्ती पोलिसांनी तपासाची चक्र जलद फिरवीत ६ जणांना अटक केली, तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची माहिती तपास अधिकारी कोकरे यांनी दिली. या प्रकाराने खन्ना कंपाऊंड परिसरात तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात शहरातील गुन्ह्याच्या व चोरीच्या प्रमाणात वाढ आल्याने पोलिसाची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: In Ulhasnagar, one was stabbed to death with a machete and a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.