शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

उल्हासनगर पालिकेचा अजब कारभार; भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, विरोधकांनी केली टीका

By सदानंद नाईक | Updated: June 13, 2025 17:01 IST

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात गुरुवारी रात्री करण्याचा अजब प्रकार उघड झाला. तर डांबरीकरण करीत असताना पाऊस आल्याचा दावा महापालिका बांधकाम विभागाने करून, रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याचे संकेत दिले आहे. 

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी पाऊस आल्याने, डांबरीकरणाचे काम थांबाविण्या ऐवजी सुरु ठेवल्याचा आरोप मनसेसह अन्य पक्ष नेते व सामाजिक संघटनेने करून संबंधितावर कारवाईची मागणी केली. पावसाळा सुरु झाल्यानंतरही डांबरीकरणाचे काम कसे? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला. शहरात रस्त्याची दुरावस्था झाली असून पाऊस पडताच खोदलेल्या रस्त्यामुळे रस्ते चिखलमय होत आहेत. खोदलेल्या खड्ड्यात गाड्या पडून अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे मनसे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांचे म्हणणे आहे.

 रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा होणार महापालिका बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वी झाले. मात्र रस्ता खराब झाल्याने गॅरंटी वेळेत या रस्त्याचे गुरुवारी रात्री डांबरीकरण सुरु केले. मात्र अचानक पाऊस आल्याने, रस्ता डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले. रस्ता खराब झाल्यास, ठेकेदाराद्वारे पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

 भुयारी गटार योजनेचे काम अर्धवट शहरांत भुयारी गटार योजनेचे काम अद्याप अर्धवट असून काम ४० टक्केही झाले नाही. मात्र ठेकेदाराला १०० कोटी पेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी दिली. तसेच खोदलेले रस्ते विशिष्ट पद्धतीने दुरस्ती न केल्याने, पावसाळ्यात रस्ते खचून अपघात होण्याची शक्यता आहे. 

१५० कोटीच्या निधीतील रस्त्याचे काम टांगलेले एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून शहरातील मुख्य ७ रस्त्याचे बांधकाम गेल्या ३ वर्षापासून सुरु आहे. मात्र अद्याप एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना महापालिकेकडून अभय दिल्याचा आरोप विविध पक्षांकडून होत आहे.