शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका परिवहन बससेवा सुसाट

By सदानंद नाईक | Updated: March 4, 2024 17:55 IST

उल्हासनगर परिवहन बससेवा सज्ज असून केंद्राच्या परिवहन पथकाने दोन दिवसांपूर्वी महापालिका परिवहन बससेवा, डेपो जागा, चार्जिंग स्टेशनची पाहणी केली.

उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवा, बस डेपोची केंद्राच्या पथकाने पाहणी करून सुसज्ज डेपोसाठी १५ कोटी ३० लाख तर डेपोच्या संरक्षण भिंतीसाठी ३ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच परिवहन बससेवा उदघाटनासाठी सज्ज असल्याची माहितीही नाईकवाडे यांनी दिली.

उल्हासनगर परिवहन बससेवा सज्ज असून केंद्राच्या परिवहन पथकाने दोन दिवसांपूर्वी महापालिका परिवहन बससेवा, डेपो जागा, चार्जिंग स्टेशनची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या शहाड, रिजेन्सी-अंटेलिया व उल्हासनगर स्टेशन जवळील सुसज्ज बस डेपोसाठी केंद्राने १५ कोटी ३० लाखाच्या निधीला मंजुरी दिली. तसेच उल्हासनगर स्टेशन जवळील परिवहन बस डेपोसाठी वालधुनी नदीला संरक्षण भिंत बांधण्यासाठी ३ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. शहाड येतील महापालिका बस डेपोत ५ बसेस उभ्या असून ५ बसेस कंपनीत तयार आहेत. परिवहन बसेवेचे उदघाटन झाल्यावर केव्हाही बसेस सुरू होणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आली. 

महापालिका परिवहन बस सेवेच्या चार्जिंग स्टेशन बांधण्याला यापूर्वीच केंद्राने ५ कोटीचा निधी दिला आहे. ३ पैकी २ चार्जिंग स्टेशन बांधून सज्ज झाले आहे. तर केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार असून पावसाळ्यापूर्वी बसेस परिवहन विभागात दाखल होणार आहेत. महापालिकेच्या परिवहन बस सेवेमुळे कमीतकमी १ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितापूर्वी महापालिका परिवहन बस सेवा रस्त्यावरून धावणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली. परिवहन बस सेवा सुरू होण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी विशेष वरिष्ठस्तरावर प्रयत्न केले आहे. एकूणच शहरवासीयांना परिवहन बस सेवेची चाहूल लागली आहे.

 परिवहन बस सेवेची प्रतिक्षा महापालिका परिवहन बस सेवा सुरू होण्यासाठी सज्ज असून ५ बसेस डेपोत उभ्या आहेत. तर ५ बसेस कंपनीत तयार व्यवस्थेत आहेत. चालक, वाहक आदी कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर ठेकेदाराकडून घेतले असून उदघाटन होताच बसेस महापालिका रस्त्यावरून धावणार आहेत. तसेच शहरवासीयांची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई