शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ ची आठ वर्षानंतर वाजणार घंटा

By सदानंद नाईक | Updated: February 18, 2025 14:00 IST

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांच्या संख्येत घट होत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला.

उल्हासनगर : पुर्नबांधणीच्या नावाखाली ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केलेल्या महापालिका शाळा क्रं-२४ व १८ च्या इमारतीचे काम अवघ्या सव्वा वर्षात पूर्णतःवाकडे आले. या शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले असून शाळेसाठी समाजसेवक प्रा. प्रवीण माळवे यांनी पाठपुरावा केला होता. 

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांच्या संख्येत घट होत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला. खेमानी येथील शाळा क्रं-२४ व १८ च्या पुर्नबांधणीच्या नावाखाली शाळा इमारत ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. त्यामुळे शाळेतील हजारो मुलांना एका खाजगी शाळेच्या इमारतीच्या क्षेत्रछायाखाली शैक्षणिक धडे गिरविण्याची वेळ आली. मूळ शाळा व आता भरत असलेल्या शाळेचे अंतर मोठे असल्याने, अनेक गरीब व गरजू मुलांनी आर्थिक परिस्थिती अभावी शाळेला कायमचा रामराम ठोकला. असी चर्चा परिसरात आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यावर्षी शाळेची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले. ४ मजली शाळेची इमारत पूर्णतः वाकडे आली असून दोन्ही शाळेत ८५० पेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत. 

महापालिका शाळा येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होण्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला असून सामाजिक संघटना व मुलांच्या पालकांनी शाळा सुरू होण्यासाठी अनेकदा आंदोलनही केली. अखेर डिसेंबर २०२३ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाल्यावर, अवघ्या सव्वा वर्षात चार मजली इमारत उभी राहिली असून यावर्षी शाळा सुरूकरण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले. नवनियुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नुकतीच महापालिका शाळेचा दौरा करून मुलांची शैक्षणिक प्रगती स्वतः बघितली आहे. खेमानी येथील शाळा इमारतीचा दौरा आयुक्तानी करून, या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यावर भर द्यावा. या मागणीने जोर पकडला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरSchoolशाळा