शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर मनपा मुख्यालयाला मिळाली हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:31 IST

तरणतलावाचा मालकी हक्क मिळाला

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडून महापालिकेला हस्तांतरण करण्यात आला. महापालिकेच्या ताब्यातील सर्वच मालमत्तेचे मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतर करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडे असल्याने शहर विकासासाठी अडसर ठरत आहे. महापालिका मुख्यालय ज्या जागेवर उभे आहे, त्या जागेची मालकी राज्य शासनाकडे आहे. मुख्यालयाच्या जागेसह गोलमैदान आणि तरणतलाव तसेच इतर जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा पाठपुरावा प्रांत कार्यालयामार्फत नगररचनाकार विभाग आणि मालमत्ता विभागाने केला. अखेर, त्याला यश येऊन मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांनी याबाबतची कागदपत्रे आयुक्तांकडे दिली आहेत. यापूर्वी आयडीआय कंपनीजवळील कबरस्तानसाठी देण्यात आलेला भूखंड, व्हीटीसी मैदान, हिराघाट बोटक्लब अशा चार भूखंडांची मालकी पालिकेला मिळाली होती. उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क पालिकेकडे हस्तांतरण करायला हवा. तसे न झाल्याने, शहरात अवैध बांधकामांचा प्रश्न उभा राहून शहर विकास ठप्प पडल्याची टीका होत आहे. जागेच्या विकासाबाबत प्रत्येकवेळी शासनाची मंजुरी घ्यावी लागत असल्याने, आजही ९० टक्के शहरवासीयांकडे मालकी नाही.

उल्हासनगर महापालिका ताब्यातील उद्याने, मैदाने, समाजमंदिरे, खुल्या जागा, प्रभाग समिती कार्यालयांसह इतर कार्यालयांच्या जागेचा मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतरण करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे