शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेतील टेंडरवॉर संपेना; माजी उपमहापौर भालेराव यांची न्यायालयात याचिका 

By सदानंद नाईक | Updated: February 28, 2024 20:26 IST

४२.५० कोटीच्या शासनाच्या मूलभूत सुखसुविधा मधील १६१ विकास कामाबाबत प्रश्नचिन्हे उभे केले.

उल्हासनगर: शासनाच्या मूलभूत सुखसुविधाच्या ४२.५० कोटीच्या निधीतून १६१ विकास कामे ३ विभागून दिल्याने, यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी केला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. 

उल्हासनगरात हजारो कोटीचे विकास कामे सुरू असून यामध्ये १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली होती. तसेच ४२.५० कोटीच्या शासनाच्या मूलभूत सुखसुविधा मधील १६१ विकास कामाबाबत प्रश्नचिन्हे उभे केले. याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांना भाजपच्या तब्बल २२ नगरसेवक व आमदार आयलानी यांनी कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याने, यामध्ये रिपाईने उडी घेतली. ४२.५० कोटीचे विकास कामे ३ ठेकेदाराला दिले असून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून शुक्रवारी सुनवाई असल्याचे भालेराव म्हणाले. 

शासनाच्या मूलभूत सुखसुविधेच्या ४२.५० कोटीच्या निधीतून एकून १६१ विविध विकास कामे निविदेद्वारे ३ ठेकेदाराना विभागून देण्यात आली. तशीच असे अनेक कोटीचे विकास कामे दिल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेत प्रशासक व आयुक्त म्हणून आयुक्त अजीज शेख हे यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे म्हणाले. ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा योजना, १५० कोटीचे मुख्य ७ रस्त्याचे काम असे हजारो कोटीचे कामे सुरू आहेत. यामध्येही अनियमितता असल्याचा आरोपही भालेराव यांनी करून याबाबतही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

भालेराव यांचा रोख आयुक्तांकडे? शासनाच्या मूलभूत सुखसुविधेची ४२.५० कोटीचे कामे वादात सापडल्याने, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. रिपाइंचे भालेराव यांनीही याप्रकाराला आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख आयुक्त शेख यांच्या कारभारावर होता. 

पत्रकार परिषदेला भाजप पदाधिकारीमहापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही रिपाईच्या पत्रकार परिषदेला आल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी कपिल अडसूळ यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी दिली. तसेच वरिष्ठ नेत्याकडे हा विषय नेल्याचे अडसूळ म्हणाले.

४२ कोटीचे कामे नियमानुसार महापालिका बांधकाम विभागाकडून शासन मूलभूत सुखसुविधेच्या निधीतील ४२ कोटीचे विकासकामे नियमानुसार दिली. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर