शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेपूर्वीच बिल चुकते, उल्हासनगर पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:04 IST

एका महापालिकेतर्फे झालेल्या फिफा फुटबॉल स्पर्धपूर्वीच कंत्राटदाराचे लाखोंचे बिल दिल्याचे उघड झाले. अव्वाच्या सव्वा आकारणा-या बिलावर डोळे झाकून सही करणा-या पालिका अधिका-यांसह संबंधितांवर कारवाई

सदानंद नाईक उल्हासनगर: एका महापालिकेतर्फे झालेल्या फिफा फुटबॉल स्पर्धपूर्वीच कंत्राटदाराचे लाखोंचे बिल दिल्याचे उघड झाले. अव्वाच्या सव्वा आकारणा-या बिलावर डोळे झाकून सही करणा-या पालिका अधिका-यांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही.उल्हासनगर महापालिकेने राष्ट्रीय उपक्रमांतर्गत फिफा फुटबॉल स्पर्धा १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान व्हीटीसी मैदान, सेंच्युरी रेयॉन कंपनीचे ग्राउंड व चांदीबाई महाविद्यालयाच्या मैदानात झाली. त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी करून आमदार चषक फुटबॉल असे नाव देण्यात आले. आमदार ज्योती कलानी, महापौर मीना आयलानी, आयुक्त राजेंद्र निंबाळकर आदींच्या हस्ते उद्घाटन झाले. फुटबॉल स्पर्धेत अंदाजे ४३ शाळांनी सहभाग घेतल्याचे दाखवले होते. शाळांना फुटबॉल देण्यासाठी १५० बॉल खरेदी केले. तसेच फुटबॉल खेळण्यासाठी लोखंडी खांब, जाळी, पाहुण्यांसह खेळाडूंसाठी जेवण, खुर्च्या, मंडप, मैदान तयार करणे, यासाठी २९ लाखांपेक्षा अधिक खर्च आला. तीन मैदानांपैकी चांदीबाई मैदानावर स्पर्धा झाली नसतानाही लाखोंचे बिल काढले.स्पर्धा १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान झाली असताना कंत्राटदाराचे बिल ४ सप्टेंबरला कसे दिले, असा प्रश्न काही जणांना पडला. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली फुटबॉल स्पर्धेचा खर्च मागवला. कार्यक्रमासाठी १५० फुटबॉल खरेदी केले असून एकाची किंमत दोन हजार रुपये दाखवली. तर, प्लास्टिकच्या भाड्याने घेतलेल्या खुर्च्यांचे भाडे प्रत्येकी ९५ रुपये, तर एक हजार जणांचे जेवण दाखवून एका ताटाची किंमत ३०० रुपये दाखवली आहे. लोखंडी खांबाचे दोन दिवसांचे भाडे ४५ हजार दाखवले असून एका टी-शर्टची किंमत ७८४ रुपये दाखवली. स्पर्धेतील साहित्यावर अव्वाच्या सव्वा किमती लावल्याचे उघड झाले असून पालिका अधिकाºयांनी डोळे झाकून बिलावर सह्या केल्या का, असा प्रश्न राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित केला आहे. अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.