शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 02:58 IST

कलानी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने राष्ट्रवादीत खळबळ

उल्हासनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या दिग्गजांमध्ये शुक्रवारी उल्हासनगरच्या आ. ज्योती कलानी यांची भर पडली. कलानी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी नाकारली होती.उल्हासनगर विधानसभेच्या उमेदवारीची पक्षाची आॅफर ज्योती कलानी यांनी धुडकावून लावल्यावर पक्षाने गटनेते भरत गंगोत्री यांना कामाला लागण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आ. ज्योती कलानी यांच्याशी संपर्क साधून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मात्र, शुक्रवारपर्यंत त्यांचा राजीनामा आला नव्हता. त्यामुळे नवीन शहर कार्यकारिणीला पक्षाने हिरवा कंदील दिला. त्यानंतर, ज्योती कलानी यांनी शुक्रवारी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवून दिला. एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पक्ष निरीक्षक सुधाकर बढे यांनी पत्रकार परिषद घेऊन ३८ जणांची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करून, शहराध्यक्षपदी हरकिरणकौर धामी यांची, तर सतीश चहाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले. आ. ज्योती कलानी यांच्यामुळे पक्षाला नुकसान होणार नसून, आता उल्हासनगरात पक्ष कलानीमुक्त झाल्याची प्रतिक्रिया भरत गंगोत्री यांनी व्यक्त केली. नवनियुक्त अध्यक्षा हरकिरणकौर धामी यांनी पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. ज्योती कलानी यांच्याशी संपर्क साधला असता आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश घेणार नसून, केवळ शहरवासीयांची सेवा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. ओमी कलानी आणि महापौर पंचम कलानी दोघेही राजकीय भूमिका घेण्याइतपत परिपक्व असल्याचे सांगून, त्याबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.राष्ट्रवादीला मोठा धक्कामाजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का दिला होता. आ. ज्योती कलानी या कट्टर नाईक समर्थक म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असली तरी, अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र, नाईकांपाठोपाठ त्यादेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, राष्ट्रवादी काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस