शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उल्हासनगरच्या महापौर, सेनेचा माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:58 IST

महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावर महापौर, उपमहापौरांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार

उल्हासनगर : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावर महापौर, उपमहापौरांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार घातल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताचे जोरदार पडसाद बुधवारी महापालिकेच्या महासभेत उमटले. शिवसेनेने केलेल्या मागणीवरून महापौर मीना आयलानी यांनी माफी मागितली, तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेच्या वतीने एकही नगरसेवक ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही, याबाबत पक्षाच्या वतीने माफी मागितली.उपमहापौर जीवन इदनानी, भाजपा व ओमी टीमच्या नगरसेवकांनी मूग गिळून बसणे पसंत केले. शहर मनसेही या विषयावर आक्रमक झाली असून त्यांनी अनुपस्थित राहणाºयांवर कारवाई करण्याकरिता थेटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले.महापालिका आयुक्त गणेश पाटील एक महिन्याच्या प्रशिक्षणाला गेल्याने, आयुक्तपदाचा कार्यभार कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोंविद बोडके यांच्याकडे दिला आहे. मात्र, त्यांनी शहराकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप सेना शहरप्रमुख चौधरी यांनी केला. प्रभारी पदभार झेपत नसेल, तर घ्यायचा कशाला, सवाल चौधरी यांनी केला. १ मे रोजी महाराष्ट्र दिन इतरत्र साजरा होत असताना महापालिकेत मात्र शुकशुकाट होता. ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर, प्रभारी आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती यांच्यासह अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त व नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.बुधवारी महासभा सुरू होताच पीआरपीचे प्रमोद टाले, शिवसेनेचे चौधरी, सुरेंद्र सावंत यांनी महाराष्ट्र दिनाचा अपमान करणाºया महापौर, उपमहापौरासह संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. यामुळे महासभेतील वातावरण तापले. महापौर आयलानी यांनी नातीची तब्येत बरी नसल्याने येऊ शकले नाही, असे सांगत उल्हासनगरवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली. शिवसेनेच्या चौधरी यांनीही अनुपस्थितीबद्दल माफी मागितली.अधिकाºयांच्यागैरहजेरीची चौकशी१महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला बहुतांश अधिकारी गैरहजर राहिले. तसेच बुधवारच्या महासभेलाही बहुतांश अधिकारी गैरहजर राहिल्याने आयुक्तांच्या जागी मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना बसावे लागले.२महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रभारी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त अनुपस्थित राहिल्याने, महासभेत प्रशासनाची बाजू मांडण्याकरिता मुख्य लेखाधिकारीपदावरील तुलनेने कनिष्ठ अधिकाºयाला बसावे लागले.३या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली व ती महापौर आयलानी यांनी मान्य केली.मनसेचेमुख्यमंत्र्यांना साकडेमहाराष्ट्र दिनाचा अपमान करणाºया महापौर, उपमहापौर यांच्यासह महापालिका अधिकारी व नगरसेवकांचा मनसेने निषेध केला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी आदींकडे केली.उपमहापौर व भाजपाचा माफीनामा नाहीचमहापौरासह शिवसेनेने भरमहासभेत अनुपस्थितीबद्दल माफी मागितली. तशीच माफी भाजपा-ओमी टीमसह उपमहापौर इदनानी यांच्याकडून अपेक्षित होती. मात्र, त्यांनी महासभेत मूग गिळून गप्प बसणे पसंत केले.महापालिकेची आमंत्रणपत्रिकाच नाहीमहापालिका जनसंपर्क विभागामार्फत १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाते. मात्र, यावेळी आमंत्रणपत्र मिळालेच नाही, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र सावंत यांनी केला. ७०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प असणारी महापालिका आमंत्रणपत्रिका देत नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी खेद व्यक्त केला.