शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:38 IST

महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली.

उल्हासनगर : महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली. महापौर निवडणुकीत बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता होती. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून गेल्या महापौर निवडणुकीत सोबत असलेले रिपाइं-पीआरपीचे ३, राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस व भारिपचे प्रत्येकी एक तसेच साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७ असे एकूण ४० नगरसेवक गृहीत धरून साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे भाजपा-ओमी टीमचे ३०, साई पक्षाचे ५, राष्ट्रवादीचा १ बंडखोर नगरसेवक असे एकूण ३६ नगरसेवक भाजपा आघाडीकडे सुरुवातीला होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे डावपेच यशस्वी झाले नाही.साई पक्षाचा फुटीर गट स्वगृहीशिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपचे दोन व साई फुटीर गटातील सातपैकी दोन नगरसेवक भाजपाला मिळाल्याने शिवसेना व फुटीर साई गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाजपा नगरसेवकांची संख्या ३६ वरून ४०, तर शिवसेनेची ४० वरून ३६ झाली. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक शिवसेना नेते व साई पक्षाच्या नगरसेवकांची याबाबत खरडपट्टी काढली. बहुमत सिद्ध होणार नसल्याने निराश झालेले साई पक्षाच्या फुटीर गटाचे नगरसेवक स्वगृही परतले. जीवन इदनानी यांनी त्यांची समजूत काढून महापौरपदाचा अर्ज मागे घेण्यास लावले. त्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली.राज्यमंत्री चव्हाणांचे डावपेच यशस्वीभाजपा-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी अल्पमतात येऊन महापौर निवडणुकीत पंचम कलानी यांचा पराभव होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत:कडे सूत्रे घेतली. शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस व भारिपच्या दोन नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यात त्यांना यश आले.त्यामुळे भाजपा आघाडीची संख्या ३६ वरून ३८ झाली. तरीही, बहुमतासाठी एका नगरसेवकाची आवश्यकता होती. साई पक्षाच्या फुटीर गटाचे सात नगरसेवक गटनेत्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यापैकी शेरी लुंड आणि कांचन लुंड यांना भाजपाने परस्पर गोव्याला नेले. त्यामुळे शिवसेनेकडील सत्तेचे पारडे भाजपाकडे झुकले.लुंड बंधू शिवसेनेच्या रडारवरगेल्या महापौर निवडणुकीत साई पक्षातील लुंड गटाला महापौरपदाचे आमिष शिवसेनेने दाखवले होते. महापौरपदाचा अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळीच लुंड व चैनानी यांच्या घरी राज्यमंत्री व पालकमंत्री यांनी ठाण मांडले. त्यांच्यात तू-तू मैं-मैं होऊन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अखेर, लुंड यांना स्थायी समिती सभापतीपद देऊन भाजपाने बोळवण केली. यावेळी पुन्हा ऐनवेळेवर साई पक्षाच्या फुटीर गटातून लुंड बंधू बाहेर पडल्याने शिवसेनेची बाजू पलटली. त्यामुळे लुंड बंधू आता शिवसेनेच्या रडारवर आहेत.मराठी वादाची किनारसाई पक्षाच्या फुटीर गटाला पाठिंबा देऊन शिवसेना सत्तेत परतणार होती. शिवसेना व विरोधी पक्षाचे बहुतांश नगरसेवक मराठी, तर भाजपा व साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक सिंधी आहेत. ऐनवेळेवर सिंधी-मराठी राजकारण झाल्याने सत्तेचे पारडे भाजपा-ओमी टीम, साई पक्षाकडे झुकले.साईबाबांच्या दर्शनानंतर सांभाळणार महापौरपदाची सूत्रेमहापौरपदी निवडून आलेल्या पंचम कलानी यांनी कॅम्प नं.-३ येथील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी, माजी महापौर हरदास माखिजा, प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींच्या उपस्थितीत महापौरपदाची सूत्रे घेऊन शहर विकासाची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.राज्यमंत्र्यांचेफोटोसेशन चर्चेतपंचम कलानी महापौरपदी निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या फोटोसेशनमध्ये राज्यमंत्री चव्हाण यांचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर असल्याने चर्चेला उधाण आले.गोपीनाथ मुंडे हरले, भाजपा जिंकलीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची राहीली आहे. त्यामुळे वडिलांच्या चुकांची शिक्षा त्यांच्या पुत्राला कशाला, अशी भूमिका घेण्याची संधी भाजपाला नाही.खुद्द ओमी यांच्यावरही भाजपाचे पदाधिकारी शुक्रमणी यांच्या भाच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा होता. मात्र, भाजपाने त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेताना हे गुन्हे मागे घेतले गेले. उल्हासनगर महापालिका ही आजही गुन्हेगारी व सर्व अनैतिक गोष्टींचा अड्डा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांच्या कब्जात ही महापालिका आहे. म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची लढाई लढण्याकरिता उल्हासनगरात वाव आहे. मात्र, ते दूरच राहिले. आता भाजपाने पप्पू कलानी यांचा वारसा चालवणाऱ्यांना पोटाशी घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे म्हणून ओळखले गेले. उल्हासनगरात भाजपाच्या वतीने जुळवाजुळवी करत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या फडणवीस यांच्या गोतावळ्यात आहेत.चव्हाण यांनी मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला नसेल, पण फडणवीस यांनी तो नक्की पाहिला आहे. त्यामुळे एका महापालिकेतील सत्ता गेली तरी बेहत्तर, पण ज्या संघर्षाच्या पायावर पक्ष उभा राहिला, तो पाय उखडून टाकणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. मात्र, या साºयांनीच मुंडे यांचे चांगले पांग फेडले. मुंडे आज हयात असते, तर त्यांनी कलानी यांच्या विजयावर कोणती प्रतिक्रिया दिली असती? त्यामुळे उल्हासनगरात गोपीनाथ मुंडे मृत्यूपश्चात पराभूत झाले आणि भाजपा जिंकली, असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या