शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या महासभेत पाण्यावरून गोंधळ, आयुक्त विरूद्ध नगरसेवक : एकाधिकारशाहीचा आरोप; दिवाळीतही टँकरद्वारे पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:13 IST

३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या

उल्हासनगर : ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या अपुºया पाणीपुरवठ्यामुळे महिला संताप व्यक्त करत असल्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांनी हा प्रश्न उचलून धरला. नळाद्बारे पाणी पुरवण्यात पालिका सक्षम नसेल, तर दिवाळीच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करा, असा प्रस्ताव नगरसेवकांनी मांडला. पण आयुक्तांनी टँकर सुरू करण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रचंड गोंधळ झाला.त्यातच अंबरनाथ ते कल्याण रस्ताबाधितांना बांधकामाच्या परवानगीवरून आणि भरतीवरूनही आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा सामना रंगला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर नवीन नगरसेवकांना मानसन्मान न देता एकाधिकारशाहीने वागत असल्याचा आरोप करून नगरसेवक मनोज लासी यांनी आयुक्तांचा निषेध केला.महासभा सुरू होताच बहुंताश नगरसेवकांनी पाणीप्रश्नी आयुक्तांना धारेवर धरले. दीड ते दोन तास पाण्यावर चर्चा झाली. त्यानंतर लासी यांनी आयुक्तांवर नगरसेवकांना कमी लेखत असल्याचा आरोपकेला.आयुक्तांची एकाधिकारशाही व मनमानी कोणताही नगरसेवक खमवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यावर त्यांच्यात आणि आयुक्तांत खडाजंगी झाली. आयुक्तांच्या वर्तनाविरोधात शासनाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनमानी कारभाराची उदाहरणे दिली.शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशान, सुनील सुर्वे, रमेश चव्हाण, साई पक्षाचे टोणी सिरवानी, गजानन शेळके, रिपाइंचे भगवान भालेराव, पीआरपीचे प्रमोद टाले, सभागृह नेता जमनू पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी, शुभांगी निकम आदींनी आयुक्तांच्या मनमानी कारभारावर टीका केली.

टॅग्स :Waterपाणी