शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला नागरिकांकडून चोप, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: December 4, 2024 14:57 IST

Ulhasnagar Crime News: जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर  - जीन्स पॅन्टचे अल्टरेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी संतप्त जमावाने टेलरला भररस्त्यात मारहाण केली. याप्रकरणी टेलरवर विनयभंगाचा तर ५ नागरिकांवर टेलरला मारहाण केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-३, रेल्वे स्टेशन परिसरात एक जीन्स पॅन्ट व कपडे अल्टरेशन दुकान आहे. या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेला जीन्स पॅन्ट घ्यायला सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेली होती. यावेळी जीन्स ट्रायल करीत असताना टेलरने बघितल्याचा आरोप तरुणीने करून, बाजूलाच्या के.पी.कलेक्शन दुकानात धाव घेतली. तीच्या सोबत घडलेला सर्वप्रकार दुकानदार व नागरिकांना सांगितला. तरुणी सोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांनी टेलरला भर रस्त्यात मारहाण केली. यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे दोन बीट मार्शल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना समजावून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी पोलिसांचे काहीएक ऐकले नाही.

संतप्त नागरिकांकडून मारहाण झालेल्या टेलरला पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून, उपचार सुरु केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी टेलरवर विनयभंगाचा तर कायदा हातात घेऊन टेलरला भररस्त्यात मारहाण करणाऱ्या ५ नागरिकांवर मारहानीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरthaneठाणे