शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामाची पाहणी, आयुक्ताच्या निर्णयाने अधिकारी व ठेकेदाराचे उडाले धाबे

By सदानंद नाईक | Updated: January 21, 2025 18:55 IST

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या २ वर्षापासून संथ गतीने सुरु आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका नवनिर्वाचित आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी एमएमआरडीएद्वारे सुरु असलेले एकूण ७ रस्ते, गोलमैदान व व्हिटीसी ग्राउंड येथील क्रिडा संकुल व अन्य विकास कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण सेवकांनी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे उपस्थित होते. 

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या २ वर्षापासून संथ गतीने सुरु आहे. तसेच ४२६ कोटीच्या भुयारी गटार योजने अंतर्गत संपूर्ण शहरांत रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकले जात आहेत. मात्र खोदलेले बहुतांश रस्ते दूरस्त केले नसल्याने, सर्वत्र धूळ व खोदलेल्या रस्त्याचे साम्राज्य आहे. नवनियुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी शहरांचा दौरा करून या विकास कामाची पाहणी करून आवश्यक सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 गोलमैदान येथील प्रस्तावित कामाचे प्रकल्प नकाशे व संपूर्ण कामाचे सलागाराद्वारे सादरीकरण करणे, एमएमआरडीएद्वारे सुरु असलेल्या ०७ रस्त्यांची कामे जलद गतीने होण्याकरीता कामाच्या भौतिक प्रगतीची दैनंदिन पाहणी करणे,, रस्त्यावरील अतिक्रमण हटविण, झाडे कापणे, भुयारी गटार योजनेची कामे आदी कामाबाबत आयुक्तानी सबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच रस्ते कामाच्या ठिकाणी बेरेकेटीग करणे, कामाचे नाव, संबंधीत विभाग, कामाची प्राकलनीय रक्कम, ठेकेदाराच्या नाव, संपर्क नंबर दर्शविणारे फलक लावण्याचे आदेशही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले आहे.

 आयुक्तानी घेतलेले निर्णय 

१) वाहतूक व्यवस्थेसाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर त्वरित कारवाई करून वाहतुक पोलिसांसोबत बैठकचे आदेश २) व्हीटीसी ग्राउंड येथील बंद असलेल्या क्रिडा संकुल ठेकेदारास नोटीस बजावण्याचे आदेश ३) गोल मैदान परिसर, व्हीटीसी ग्राउंड रस्ता, स्वर्गद्वार स्मशानभूमी या ठिकाणी कचरा दिसून आल्यामुळे संबंधित स्वच्छ्ता निरीक्षक ह्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ४) शहरात दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे झाली नाहीतर, शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्तानी दिले.