शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसानं उल्हासनगरात ४३ झाडे पडली, तर २३ घरांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 17:40 IST

काही झाडे विद्युत तारा व घरावर पडल्याने अनेक ठिकाणची वीज रात्री उशिरापर्यंत गुल होती.

उल्हासनगर : संततधार पावसाने शहराला झोडपले असून, कालपासून आजपर्यंत ४३ झाडे उन्मळून पडली. तर २३ घराचे अंशतः नुकसान झाले. गुलशन नगर, फर्निचर मार्केट, शहाड फाटक आदी ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून घरात पाणी गेले आहे. उल्हासनगरला संततधार पावसाने झोडपले असून, दोन दिवसांत एकूण ४३ झाडे उन्मळून पडली. काही झाडे विद्युत तारा व घरावर पडल्याने अनेक ठिकाणची वीज रात्री उशिरापर्यंत गुल होती. तर २३ घराचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांनी दिली.व्हीटीसी मैदान, आरजीएस शाळा, दुर्गापाडा, कैलास कॉलनी, शहाड फाटक आदी ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कॅम्प नं -३ फर्निचर मार्केट मधील नाली तुंबल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येवून अनेक दुकानात पाणी घुसले. गुलशन नगर व शहाड फाटक येथेही नाली तुंबून अनेक घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांनी वीज मंडळाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. शहरात कालपासून आजपर्यंत ४३ झाडे तर अनेक ठिकाणी नाली तुंबून पाणी घरात घुसल्याच्या घटना घडल्या असल्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली. ७० टक्केपेक्षा जास्त नालेसफाईचे काम झाल्याने, नाले तुंबल्याच्या घटना एकदा अपवाद वगळता घडल्या नसल्याची प्रतिक्रिया मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली. मात्र ५ कोटीच्या निधीतून रस्त्यातील खड्डे भरणे, रस्त्याची दुरुस्ती करण्याची निविदा काढूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांना खड्ड्याच्या रस्त्याचा सामना यावर्षी करावा लागणार आहे.