शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, हाडे, डोंबिवली पूर्वेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:40 IST

डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील पांडुरंग केणे चाळीला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, कातडी आणि हाडे सापडल्याने रहिवाशांना धक्का बसला आहे.

कल्याण -  डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरातील पांडुरंग केणे चाळीला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीत कोंबडीची पिसे, कातडी आणि हाडे सापडल्याने रहिवाशांना धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची ही फ्री मटेरियल सेवा चर्चेचा विषय ठरली आहे.पांडुरंग केणे चाळीत राहणारे समीर पाटील म्हणाले की, त्यांच्या चाळीत १६ बिºहाडे राहतात. पाटील यांच्या घरातील नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याने पाच वर्षांपासून चाळीसाठी सहा इंची नवीन जलवाहिनी टाकली होती. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने रविवारी त्यांनी दुरुस्तीसाठी प्लंबरला पाचारण केले. दुरुस्तीच्या वेळी जलवाहिनीमध्ये कोंबडीची कातडी, पिसे, हाडे सापडली. जवळपास ६० ग्रॅम वजनाची कातडी, पिसे, हाडे जलवाहिनीत अडकली होती. हा कचरा काढल्यानंतर पाणीपुरवठा जास्त दाबाने सुरू झाला आहे. कोंबडीची पिसे, कातडी, हाडे जलवाहिनीत आली कुठून, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.पाटील म्हणाले की, शाकाहारींसाठी हा प्रकार सर्वात किळसवाणा आहे. मी स्वत: शाकाहारी असल्याने या प्रकाराने हादरलो आहे, असे त्यांनी सांगितले.केणे चाळीला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीत डीएनसी येथील महापालिकेच्या जलकुंभातून पाणी सोडले जाते. तेथे सुरक्षारक्षक नाही. अनेकदा या टाक्यांवर दारूपार्ट्या झडत असल्याचे प्रकारही उघड झाले होते. या बहाद्दरांकडूनच या टाक्यांमध्ये कोंबडीची पिसे, कातडी व हाडे टाकली असावीत. तसेच बड्या जलवाहिनीशेजारी असलेल्या ढाब्यातून फेकलेला कचरा फुटलेल्या जलवाहिनीत गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही प्रभागांमध्ये आधीच दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर असताना या किळसवाण्या प्रकाराने पालिकेचा बेजबाबदारपणाच उघड झाला आहे. ते नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारे आहे. महापालिका केवळ कर वसूल करते; मात्र कर भरणाऱ्यांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करणे हे महापालिका कर्तव्य समजत नसल्याचा आरोप चाळवासीयांनी केला आहे. यासंदर्भात तक्रार केलेली नसली, तरी महापालिकेने स्वत:हून या प्रकाराची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली