शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या हल्ल्यात दोन वर्षांचा मुलगा जखमी , उल्हासनगरची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 04:28 IST

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षांचा कुणाल निकम हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे.

उल्हासनगर : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षांचा कुणाल निकम हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी या कुत्र्याला मारून टाकले.उल्हासनगर कॅम्प नं. ५, हिललाइन पोलीस ठाण्यामागे कुणाल विनोद निकम हा राहतो. गुरुवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने घरासमोर उभ्या असलेल्या कुणालवर अचानक हल्ला केला. यात कुणाल गंभीर जखमी झाला असून, त्याला शहरातील खासगी, तसेच मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रेबीज उपचाराची सोय नसल्याने तेथून केईएम रुग्णालयात नेले. बेशुद्ध कुणालवर उपचार सुरू आहेत.या कुत्र्याने आणखी सहा जणांचा चावा घेतल्याचे उघड झाले. तर मेलेल्या कुत्र्याचे शवविच्छेदन करणार असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागातून देण्यात आली.पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी सांगितले की, एका वर्षापूर्वी २ हजारांपेक्षा अधिक श्वानांची नसबंदी केली, तसेच रेबीजचे इंजेक्शन महापालिका मध्यवर्ती रुग्णालयासह आरोग्य केंद्रात दिले जाते. या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला अपयश आल्याची टीका होत आहे.महिन्याला ४०० जणांना चावाशहरातील मध्यवर्ती रुग्णालयात दरमहा चारशेपेक्षा अधिक लोकांचा कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे. रात्री १० नंतर कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरत असतात. पालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीऐवजी त्यांना पकडून जंगलात सोडायला हवे, अशी मागणी अपंग सेवा संघटनेचे भरत खरे यांनी केली आहे.

टॅग्स :dogकुत्राulhasnagarउल्हासनगर