शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, दोघांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:42 IST

ठाण्यातील घटना : दोघांचे प्राण वाचविण्यात यश, स्वच्छता करताना रसायनाच्या वासाने श्वास कोंडला

ठाणे : पाचपाखाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र मराठा मंडळाच्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीची सफाई करताना विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवणकर (३०) या दोन कामगारांचा रसायनाच्या (एसबी-२) वासाने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नौपाड्यातील हरिनिवास सर्कलजवळ मोनालिसा इमारतीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र मराठा मंडळाची तळ अधिक तीन मजली इमारत आहे. याच इमारतीमधील २५ फूट खोल  पाण्याची टाकी साफ करण्यासाठी रविवारी  विवेक कुमार याच्यासह चौघे कामगार उतरले होते. नीलेश ताम्हाणे या ठेकेदाराने बाबर या सुपरवायझरच्या देखरेखीखाली त्यांचे हे काम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झाले होते. पाण्याची टाकी साफ करताना वॉटर प्रुफिंगसाठी बीएसएफ कंपनीचे एसबी -२ हे रसायन त्यांनी वापरले. त्याच्याच वासाने टाकीमध्ये त्यांचा श्वास कोंडला. यात चौघेही बेशुद्ध पडले. अर्धवट शुद्धीत असलेल्या दाेघांनी आरडाओरडा केला. ही माहिती मराठा सेवा मंडळाकडून मिळाल्यानंतर नाैपाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजध धुमाळ, रामचंद्र वळतकर आणि सहायक पेालीस निरीक्षक योगेश लामखेडे आदींच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने या चौघांपैकी गणेश नरवणकर आणि  मिथुन ओझा यांना बाहेर काढले. त्यांच्यावर तातडीने डॉ. उमेश आलेगावकर यांनी उपचार केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत बाहेर काढलेले विवेक आणि  योगेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. टाकीत उतरलेल्या या चारही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. त्यानंतर ही माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच त्यांनी  बचावकार्य केल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.  

ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात धावपळ सुरु होती. कामगारांची काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांनी ठेकेदारावर संताप व्यक्त केला. ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.

पोलीस आणि डॉक्टरांची तत्परता..या दुर्घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांसह खासगी रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर तिथे पोहोचले. त्यांनी तातडीने उपचार केल्यामुळे सुरुवातीला टाकीतून बाहेर काढलेल्या गणेश आणि  मिथुन या दोघांचे प्राण वाचल्याची माहिती  सूत्रांनी दिली. एरवी संबंधित यंत्रणा वेळेत पोहचू न शकल्याने संताप व्यक्त केला जातो. पण या घटनेत पोलीस, डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल येथील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :thaneठाणे