शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सोनसाखळीसह दुचाकी वाहनांची चोरी करणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 20:44 IST

ठाणे शहर परिसरात मोटारसायकली तसेच सोनसाखळी जबरी चोऱ्या करणाºया खालीद मुज्जमिल अली उर्फ निग्रो (२३, रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर भागातून नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेची कामगिरीदागिन्यांसह सात लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर परिसरात मोटारसायकली तसेच सोनसाखळी जबरी चोऱ्या करणाºया खालीद मुज्जमिल अली उर्फ निग्रो (२३, रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर भागातून नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी, मंगळसूत्र आणि पाच मोटारसायकली असा सात लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.सोनसाखळी चोºया करणाºया टोळीतील मुज्जमिल हा मुंब्रा बायपास सेवा रस्त्यावर येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १४ जून रोजी मुंब्रा बायपास मार्गावर मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सापळा लावून खालीद मुज्जमिल आणि त्याचा साथीदार अरशद शेख (२०) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडील विना क्रमांकाची एक मोटारसायकलही हस्तगत केली. त्यांच्याकडे अधिक चौकशीतून ही दुचाकी चोरणारा रिजवान शेख (२०) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याच चौकशीतून या तिघांनी शहरातील वेगवेगळया भागात चोºया केल्याचे उघड झाले. त्यांनी कापूरबावडी, कोपरी, कळवा आणि श्रीनगर अशा चार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोºया तसेच महिलांच्या गळयातील सोनसाखळया जबरी चोºया केल्याचीही कबूली दिली. या पथकाने त्यांच्याकडून चार लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यांच्यापैकीच रिजवान हा सराईत गुन्हेगार असून वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यात त्याला यापूर्वीही अटक झाली आहे. त्याने आतापर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन तर मानपाडा आणि कळवा पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबूली पोलिसांना दिली. त्याच्याकडून तीन लाख रु पयांच्या दुचाकी या पथकाने जप्त केल्या आहेत. या टोळीकडून चार जबरी चोºया आणि पाच मोटारसायकलींच्या चोºया अशा नऊ गुन्ह्यांची उकल झाल्याचे मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सांगितले. तिघांनाही १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी