शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:08 IST

रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली.

डोंबिवली : रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली. अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी (रा. बस्ती, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती तपासाधिका-यांनी दिली.तपासाधिकारी पोलीस निरीक्षक एस. व्ही. ढाकणे यांनी सांगितले की, अंग्रेज आणि रामचरण हे दिवा गावातील एका घरात फरशी बसविण्यासाठी सोमवारी सकाळी आले होते. त्या वेळी फाटक बंद असतानाही ते पश्चिमेहून पूर्वेला रेल्वे फाटकातून दुचाकी नेत होते. मात्र, मुंबईकडे जाणाºया सेवाग्राम एक्स्प्रेसच्या वेगाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे या एक्स्प्रेसची त्यांच्या दुचाकीला धडक बसून ते जखमी झाले. या दोघांना गावातील जीवनदीप रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’अपघात घडल्यानंतर स्थानकात आरडाओरडा झाल्याने काही वेळ सेवाग्राम एक्स्प्रेस थांबली होती. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ मदतकार्यात अडथळा आला. परंतु, रेल्वे पोलिसांनी त्यांना पांगवले.दिव्यातील म्हात्रे नामक व्यक्तीकडे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी अंग्रेज आणि रामचरण आले होते, पण ते कुठले रहिवासी होते, दिव्यात कधीपासून आले होते, काय काम करत होते, आदी तपशील मिळविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त दुचाकी ही कपिल माळी यांच्या नावे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, परंतु माळी यांनी मोबाइल फोन न उचलल्याने दुचाकी त्या दोघांकडे कशी आली, याची माहिती मिळविण्यात अडथळे आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, मध्य रेल्वेच्या उपनगरीय यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य अ‍ॅड. आदेश भगत यांनी घटनास्थळी पाहणी केली. ते म्हणाले की, ‘गेटमनने दुचाकीस्वारांना फाटक बंद असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. ते पुढे गेल्याने अपघात झाला.’>...तरीही रूळ ओलांडणे सुरूचदिवा स्थानकातील या अपघातानंतर पूर्वेला रेल्वे फाटकाजवळ रेल्वे सुरक्षा बलाचे दोन पोलीस तैनात करण्यात आले. मात्र, तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून प्रवास करत होते. त्यामुळे पोलीस हतबल असल्याचे दिसून आले.फाटकात कायमस्वरूपी पोलीस तैनात करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असतानाही सुरक्षा यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवास धोका आहे.