शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांअभावी दोन हजार कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:48 IST

आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.

बदलापूर : सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगारांअभावी सध्या प्रचंड नुकसान होत आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्याने एमआयडीसीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आनंदनगर एमआयडीसीला महिन्याला दोन हजार कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.अंबरनाथ एमआयडीसीत १ हजारापेक्षा अधिक कंपन्या असून तिथे जवळपास २५ हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावाला गेल्याने कामगारांची चणचण एमआयडीसीत निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल २ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती तायडे यांनी दिली. तर, दुसरीकडे मनसेने हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादीही संघटनेला दिली आहे.>अंबरनाथ एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार हे परराज्यांतील असल्याने त्याचा थेट फटका कंपनीच्या उत्पादनाला बसत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर कारखानदारांनी काम सुरू केले. मात्र, त्यांना हवे त्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच जे कामगार उपलब्ध आहेत, त्यांना ये-जा करण्यासाठी वाहतुकीची साधने नसल्याने ही परिस्थिती अधिकच बिघडली आहे.