शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन सावत्र मुलींवर पित्याचा लैंगिक अत्याचार: श्रीनगर भागातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:37 IST

ठार मारण्याची धमकी देत आपल्याच सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम पित्याविरुद्ध त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देवाच्यता केली तर ठार मारण्याची धमकीमोठया मुलीवर दोन वर्षांपूर्वी आता लहानीवरही केला अत्याचार संतप्त पत्नीने दिली पतीविरुद्ध तक्रार

ठाणे : स्वत:च्याच दोन सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-या पित्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्याविरुद्ध पत्नी गुन्हा दाखल करणार असल्याची कुणकुण लागताच तो पसार झाला आहे.आपल्याच पंधरावर्षीय मुलीच्या अज्ञानाचा आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेऊन वागळे इस्टेट, श्रीनगर भागात राहणाºया कारचालकाने २ मार्च २०१८ रोजी आपल्या दुस-या पत्नीच्या मुलीला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आइस्क्रीम देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. तिला हिल ब्रिज श्रीनगर येथून नाशिक बाजूकडील हायवेवर एका निर्जनस्थळी नेऊन कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर, तिला जबरदस्तीने बीअर पिण्यास भाग पाडून तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने घरी जाण्याचा तगादा लावल्यानंतर याबाबतची वाच्यता केल्यास तुला संपवून टाकेन, अशीही धमकी त्याने दिली. ३ मार्च रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत तो तिच्याशी हे चाळे करत होता. घरी परतल्यानंतर आईला तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. २०१४ मध्ये याच मुलीच्या अठरावर्षीय मोठ्या बहिणीवरही त्याने श्रीनगर भागात लैंगिक अत्याचार केला होता. मात्र, त्या प्रकारानंतर तरी त्याच्यात सुधारणा होईल, अशी पत्नीला अपेक्षा असतानाच त्याने दुस-या मुलीचाही तशाच प्रकारे लैंगिक छळ केल्यानंतर संतप्त झालेल्या या मुलींच्या आईने (आरोपीची दुसरी पत्नी) श्रीनगर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी रात्री तक्रार दाखल केली आहे. आरोपीची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाRapeबलात्कार