शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब कोसळून दोघे जखमी

By admin | Updated: February 23, 2017 05:51 IST

मीरा रोडच्या नयानगरमधील एका इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगरमधील एका इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी नऊ महिन्यांच्या बाळासह एकूण सात जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास सांगितले. लोधा मार्गावर सीतास्मृती नावाची सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या बी विंगमधील सहाव्या मजल्यावर इमरान अली शेख (३५) हे कुटुंबासह राहतात. बुधवारी दुपारी इमरान हे पत्नी जहारासह हॉलमध्ये होते. तर भाऊ शमशाद, त्याची पत्नी आयशा तसेच लहान मुले कामरान, आयशा व ९ महिन्यांचा आहिल हे बेडरूममध्ये होते. पावणेतीनच्या सुमारास हॉलचे फ्लोअरिंग कोसळून पाचव्या मजल्यावर पडले. इमरान व जहारा स्लॅबसह खाली कोसळून जखमी झाले. सुदैवाने मुले बेडरूममध्ये असल्याने बचावली. या घटनेने शेजारी व परिसरातील नागरिक धावून आले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. इमरान व जहारा यांना रुग्णालयात दाखल केले. सहाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या शमशाद अली शेख (३८), आयशा शमशाद शेख (३०), कामरान (वय ८), आयशा (वय २) व आहिल, तर पाचव्या मजल्यावरील सीताराबानू व शहाबानू अशा सात जणांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले. उपायुक्त दीपक पुजारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. आम्ही रहिवाशांना इमारत रिकामी करायला सांगितले आहे. (प्रतिनिधी)