शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:24 IST

एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देभुखंडाचे श्रीखंड खातय कोणदोनही ठरावांवर महापौरांच्या सह्या

ठाणे - एकाच शैक्षणिक संस्थेला भुखंड वितरीत करण्याबाबत चक्क दोन वेगवेगळे ठराव करण्यात आल्याची बाब नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी उघडकीस आणली. एका ठरावात या संस्थेने मागितलेली जमीन आणि दुसºया ठरावात मागणीपेक्षा तब्बल २३४० चौ. मी. जागा महापालिकेने दिली असल्याचा आरोप पवार यांनी केला. परंतु प्रशासनाने मात्र दुसरा ठराव खोटा असल्याचे सांगत पवार यांचे आरोप फेटाळून लावले.             शनिवारी झालेल्या महासभेत पवार यांनी याबाबतचे पुरावे देखील सभागृहात सादर केले. ठाणे महापालिकेकडे मे. सिध्देश चॅरिटेबल ट्रस्ट ने ३३०० चौ.मी. जागा मागितली होती. त्यामध्ये महापालिकेने केलेल्या पहिल्या ठरावानुसार त्यांना मागितलेल्या जागे पेक्षा अधिक ५ हजार ६८४ चौ. मी. जागा २०१७-१८ च्या रेडिरेकनर दराप्रमाणे वार्षिक भाडेपट्ट्याने ३० वर्षासाठी देण्याचा एक ठराव करण्यात आला आहे. तर त्याचवेळी दुसऱ्या ठरावात मे. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट यांना ५ हजार ६८४ चौ. मी. जागा न देता त्यांनी विंनती केल्याप्रमाणे ३ हजार ३०० चौ. मी. इतके क्षेत्र कासारवडवली येथे देण्यात यावे असा दुसरा ठराव करण्यात आल्याचा गौप्यस्फोच पवार यांनी महासभेत केला. विशेष म्हणजे या दोन्ही ठरावांवर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले. महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी पवार यांच्या आरोपांचे खंडण करीत असे कोणत्याही प्रकारचे दोन प्रस्ताव नसून तसे असल्यास सदस्यांनी अशा प्रस्तावाची मूळ प्रत सादर करावी त्याची झेरॉक्स कॉपी सादर करू नये असे स्पष्ट केले. मात्र पवार त्यांच्या आरोपावर मात्र ठाम होते. त्यामुळे नेमका ठराव खरा कोणता आणि खोटा कोणता याबाबत मात्र संभ्रम कायम राहिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त