शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर भागात पातलीपाडा येथे संरक्षक भिंत घरांवर पडल्याने एकाचा मृत्यु , दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:58 IST

नाल्याच्या बाजूला असलेली आरक्षित भुखंडाची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली.

ठळक मुद्देसंरक्षक भिंतीच्या मुद्यावरुन संभ्रमदुरुस्तीची केली होती मागणी

ठाणे - दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने सोमवार पासून पुन्हा बरसण्यास सुरवात केली आहे. या पावसामुळे धोकादायक भिंत पाच घरांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यु झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे.                         सोमवार पासून ठाण्यात पुन्हा पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये पाच ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आगीची एक व अन्य १२ अशा एकूण २० तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु यामध्ये एक संरक्षक भिंत पडल्याची देखील घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली आहे. नाल्याच्या बाजूला असलेल्या पाच झोपड्यांवर रात्री १२ च्या सुमारास ही भिंत पडली. यामध्ये प्रकाश वाळवे (३५) यांचा जागीचा मृत्यु झाला आहे. तर भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या असून समय जाधव हा १० वर्षीय मुलगा देखील यात जमखी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पालिका प्रशासनाला योग्य ते सहाकार्य करण्याच्या सुचना केल्या. दुसरीकडे ही भिंत पडल्याने येथील काही घरांमध्ये देखील नाल्याचे पाणी शिरले होते. परंतु आता या संरक्षक भिंतीच्या मुद्यावरुन अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. ज्या ठिकाणी ही संरक्षित भिंत उभी आहे, ती जागा पालिकेच्या टर्मनिलसाठी आरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पालिकेने हा भुखंड अद्याप ताब्यात घेतलाच नसल्याचा दावा पालिकेच्या सुत्रांनी केला आहे. संबधीत जागा मालकानेच ही कच्ची भिंत उभारली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.दरम्यान ही कमकुवत झालेली संरक्षक भिंत दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु ती न करण्यात आल्यानेच ही घटना घडली असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात