शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: January 18, 2024 20:27 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: एका पीडितेची सुटका

ठाणे: डोंबिवलीतील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला व्यवस्थापकासह चाैघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील काटई टोल प्लाझाजवळील लोढा पॅलेसजवळ असलेल्या ‘आमंत्रण लॉजिंग अँड बोर्डिंग’ या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास एका खबऱ्याने दिली होती. त्याच माहितीच्या आधारे १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने काटई टोल प्लाझाजवळील या हॉटेलमध्ये सापळा रचून एक पुरुष दलाल, दोन पुरुष वेटर आणि एक महिला व्यवस्थापक यांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटकाही करण्यात आली आहे. या आरोपी विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात कलम ३७० (२) , ३४, सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिडित महिलेला उल्हासनगर येथील सुरक्षा गृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वेटर आणि दलाल पाठवायचे मुलींचे फोटो-या हॉटेलमधील वेटर आणि दलाल हे ग्राहकांना हेरुन आधी सौदा करायचे. त्यानंतर ते पैशाच्या अमिषाने शरीरविक्रयासाठी तयारी दर्शविणाऱ्या मुलींचे फोटो व्हॉटसअॅपवरुन ग्राहकांना पाठवायचे. यातील काही पैसे स्वतत:कडे तर काही पैसे हे त्या मुलींना दिले जायचे. पोलिसांच्या बनावट ग्राहकानेही असे फोटो मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर या हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे