शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीप्रकरणी दोन नायजेरियन युवकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:46 IST

खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करणाऱ्या एजओकू

ठाणे : खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करणाऱ्या एजओकू संडे ऊर्फ स्टॅनली संडे (४१) आणि ओनकांची अ‍ॅन्थोनी मडू (४०) या दोघा नायजेरियनना अटक केल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली. आतापर्यंत या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या नियंत्रणाखाली ठाकरे यांच्या पथकातील रणवीर बयेस, उपनिरीक्षक अशोक माने, वसंत शेडगे, पोलीस नाईक रवींद्र काटकर, चंद्रकांत वाळुंज, संजय बाबर, पोलीस शिपाई भगवान हिवरे आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.काय आहे गुन्ह्याची पद्धतएजओकू संडे आणि ओनकांची मडू यांनी फेसबुक किंवा ई-मेलद्वारे अनेकांशी संपर्क करून त्यांची कंपनी भारतातून खेकड्याचे निळे रक्त खरेदी करते आणि त्याचा औषध बनवण्यासाठी वापर करते, असे भासवून त्यांचा (केंट फार्मास्युटिकल्स लि. यूके) भारतातील संचालक अब्दुल कादीर कच्छी आणि एजंट सतीश याच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर रकमा वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर घेऊन ही रक्कम अब्दुल हा वेळोवेळी बँकेतून काढून घेत असे. त्यातील ६० टक्के रक्कम नायजेरियन आरोपी, तर ४० टक्के रक्कम अब्दुल स्वत:कडे ठेवत होता, असे तपासात उघड झाले आहे.आंतरराष्टÑीय टोळी...अटक केलेल्या आरोपींच्या तपासामध्ये अशा प्रकारे गुन्हा करणाºया गुन्हेगारांची आंतरराष्टÑीय टोळी असून ती सध्या भारतातील विविध राज्यांत सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. अब्दुल याच्याविरुद्ध यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अशाच प्रकारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात त्याला अटकही झाली होती. तर, अ‍ॅन्थोनी मडू याच्याविरुद्ध मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या आंतरराष्टÑीय गुन्हेगारांच्या टोळीतील इतरांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहपोलीस आयुक्त पांडेय यांनी सांगितले.गेल्या चार वर्षांपासून या कंपनीचे खाते सुरू आहे. त्यामुळे आणखीही कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा. - मधुकर पांडेय, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर.