शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

महिलेवर बलात्कार करुन लूट करणाऱ्या दाेघांना जन्मठेपेची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: March 7, 2025 22:30 IST

ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल: दाेघांनाही प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीतील २८ वर्षीय अधिकारी महिलेवर सामुहिक बलात्कार करुन लूट करणाऱ्या सुरेश पांडुरंग गोसावी (३२, रा. दहिसर पूर्व,मुंबई ) आणि उमेश उर्फ राकेश झाला ( ३१, रा.दहिसर पूर्व, मुंबई) या दाेघांनाही जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

ठाण्यातील घाेडबंदर राेड भागात राहणारी ही पिडीत महिला १९ डिसेंबर २०१७ राेजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारासमीरा राेड येथून ठाण्याकडे येण्यासाठी निघाली हाेती. त्यावेळी काशिमीरा नाका येथे जाणाऱ्या कारला हात देऊन त्या कारमध्ये ती बसली. या कारमध्ये आधीच एकजण बसलेला हाेता. कार चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला गायमुख बसस्टॉप पर्यंत नेले. तिथून परत यूटर्न घेत आधी तिच्याकडील माेबाईल आणि राेकड जबरदस्तीने काढून घेतली. नंतर तिला धमकावून मुंबई अहमदाबाद महामार्गावर नेऊन तिच्यावर चालकासह दाेघांनीही बलात्कार केला हाेता. नंतर तिचे सोन्याचे दागिने काढून घेऊन तिला पुन्हा वज्रेश्वरी येथे एका लॉजमध्ये नेले. तिथे तिने आरडाओरडा केल्यानंतर या दाेघांनीही तिथून पळ काढला.

याप्रकरणी काशीमीरा पाेलीस ठाण्यात बलात्कारासह जबरी चाेरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी सुरेश आणि उमेश या दाेघांना अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायाधीश वसुधा भाेसले यांच्या न्यायालयात ७ मार्च २०२५ राेजी झाली. यामध्ये १९ साक्षीदार तपासण्यात आले. आराेपींना शिक्षा हाेण्यासाठी सरकारी वकील राजेंद्र पाटील आणि वर्षा चंदने यांनी जाेरदार बाजू मांडली. दाेघांनाही जबरी चाेरी आणि बलात्काराच्या गुन्हयात दाेषी धरुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तपासी अधिकारी म्हणून वैभव शिंगारे यांनी तर पेरवी अधिकारी म्हणून पाेलीस अंमलदार साईदास चव्हाण आणि अनिल मढवी यांनी काम पाहिले.

टॅग्स :thaneठाणे