शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विदेशीच्या चलनाच्या बदल्यात भारतीय चलन पाहिजे असल्याची बतावणी करुन दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:33 IST

अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यामध्ये भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी करीत एका ४१ वर्षीय व्यक्तीला त्रिकुटाने दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शीळफाटा भागात घडली.

ठळक मुद्दे त्रिकुटाने केली फसवणूकडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मृत महिलेच्या सामानामध्ये अमेरिकन डॉलर्स मिळाले असून ते बदलून भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी करीत एका ४१ वर्षीय व्यक्तीला त्रिकुटाने दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शीळफाटा भागात घडली. या प्रकरणी बुधवारी डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवी मुंबईतील वाशी सेक्टर १८ येथे राहणारे श्रीनाथ अयोध्या सोनाथ यांच्या ओळखीच्या राजू नामक मित्राने त्याच्या मावशीला मृत पावलेल्या महिलेचे समान मिळाले असून त्यातील गादीमध्ये अमेरिकन डॉलर्स सापडले आहेत. त्या डॉलर्सच्या बदल्यात भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी केली. तसेच विदेशी चलनाचे आमिष दाखवून राजूचा मित्र आणि त्याची मावशी यांनी सोनाथ यांना रोख रक्कम घेऊन कल्याणफाटा डायघर येथे बोलविले. यावेळी सोनाथ यांच्याकडून आरोपींनी भारतीय चलनाच्या दोन लाखांच्या नोटा घेऊन सोनाथ यांच्या हातात वर्तमानपत्राचे बंडल बंदल असलेली कापडी पिशवी दिली. त्यानंतर तिथून पलायन केल्याची घटना ४ सप्टेंबर २०२० रोजी घडली. काही काळाने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर श्रीनाथ यांनी डायघर पोलीस ठाण्यात राजू आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्याविरुद्ध ७ आॅक्टोंबर २०२० रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी