शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा ठाण्यात हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:50 IST

६0 हजार रुपयात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विकणार्‍या झारखंडच्या एका आरोपीस ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाईझारखंडच्या आरोपीस अटक६0 हजार रुपयात एक लाखाच्या नोटा

ठाणे : बनावट नोटा विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या झारखंडच्या एका आरोपीस खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी ठाण्यात अटक केली. आरोपीजवळून सुमारे २ लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.प्रकास प्रसाद उर्फ शंकर टोकल मोहतो (४२) हे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील धर्मविरनगरचा रहिवासी आहे. मिस्त्री काम करणारा हा आरोपी मुळचा झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्याचा रहिवासी आहे. ६0 हजार रुपयात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विकण्याचा धंदा आरोपी करीत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यानी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी ग्राहक बनून आरोपीशी संपर्क साधला. त्याला पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या बनावट नोटा मागितल्या होत्या. मंगळवारी दुपारी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर बनावट नोटा घेऊन येण्यास आरोपी तयार झाला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस.आर. गावंड, एच.ए. ढोले आणि व्हि.के. बाबर आदींच्या पथकाने सापळा रचला. दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास आरोपी ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर पोहोचताच पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. आरोपीची अंगझडती घेतली असता २ हजार रुपयांच्या ११३ आणि नवीन ५00 रुपयांच्या १0 बनावट नोटा त्याच्याजवळ आढळल्या. याशिवाय १00 रुपयांच्या दोन खर्‍या नोटाही त्याच्याजवळ होत्या. एकूण २ लाख ३१ हजार २00 रुपये पोलिसांनी आरोपीजवळून हस्तगत केले. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याविरूद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस