शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 05:48 IST

cylinder blast : भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

भिवंडी : तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.     प्रेम अनंत भोईर (२२) व अक्षय गौतम (२१) अशी मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. पारसनाथ कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात अनेक छोटे-मोठे कारखाने व गोदामे असून या ठिकाणी ईजी स्टील वेल्डिंग कारखान्यात कामगार काम करीत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की परिसरात सर्वत्र या स्फोटाचा आवाज ऐकायला आला. समोरील इमारतीच्या भिंतीलाही तडे गेले असून येथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी माणकोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.विशेष म्हणजे या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य दखल घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असतानाही येथील कारखाना मालक कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना का करीत नाहीत, असा सवाल वारंवार उपस्थित होत आहे. 

एकाची प्रकृती चिंताजनक n या सिलेंडर स्फोटात एकूण चार जण जखमी झाले असून त्यातील मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन ( रा.भिवंडी ) विवेकानंदा बारीकी (रा. वळपाडा ), बजरंग शुक्ला ( रा.पारसनाथ कंपाऊंड ) या तिघा जखमींवर मानकोली नाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर अल्पेश भोईर ( रा. वाडा ) याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . दरम्यान घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे. चौकशीअंती या मध्ये  दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट