शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

४0 लाखाचे दागिने हडपणार्‍या दोन सराफा व्यावसायिकांवर ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:36 IST

ग्राहकांचे ४0 लाख रुपयांचे दागिने हडपणार्‍या दोन सराफा व्यावसायिकांविरूद्ध ठाण्यातील कोपरी पोलिसांनी दाखल केले. त्यांच्याविरूद्ध २४ ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत.

ठळक मुद्देकमी व्याजदराचे आमिष२४ ग्राहकांच्या तक्रारीएक सराफा व्यावसायिक घाटकोपरचा

ठाणे : कमी व्याजदराने पैसे देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४0 लाख रुपयांचे दागिने हडपणार्‍या दोन आरोपींविरूद्ध कोपरी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सराफा व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपी जगदीश प्रजापती याचे कोपरी येथील गांधीनगरात चिराग ज्वेलर्स नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. आपली सरकारमान्य सोन्याची पेढी असून दागिने गहाण ठेऊन कमी व्याजदराने पैसे देत असल्याचे तो ग्राहकांना सांगायचा. ४ वर्षांपासून लोकांनी विश्वास ठेऊन त्याच्याकडे दागिने गहाण ठेवले. या दागिन्यांवर प्रजापतीने त्यांना सुरूवातीला ३ टक्के व्याजाने पैसे दिले. मात्र अडचण संपल्यानंतर संपूर्ण रक्कम घेऊन दागिने सोडविण्यासाठी ग्राहक दुकानावर गेले असता त्यांना टाळाटाळ केली जायची. आपण घाटकोपर येथील कृमघ्य उर्फ टिपू बोरा याच्या मधुरम ज्वेलर्सकडे दागिने ठेवले असल्याचे सांगून त्याने ग्राहकांची बोळवण करण्यास सुरूवात केली. प्रजापतीचे खरे रूप समजल्यानंतर ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या. आतापर्यंत कोपरी पोलिसांकडे २४ ग्राहकांनी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या. या ग्राहकांना प्रजापतीने ४0 लाख ४१ हजार ४२५ रुपयांनी लुबाडले. काही ग्राहकांनी दागिने बनविण्यासाठी प्रजापतीकडे रोख रकमाही दिल्या होत्या. प्रजापतीने त्यादेखील हपडल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली.तृतियपंथियांनाही लुबाडलेचौका-चौकात भिक मागून पोट भरणार्‍या काही तृतियपंथियांनी पैसा-पैसा जमवून जगदीश प्रजापतीकडे दागिने बनविण्यासाठी रक्कम जमा केली होती. आरोपीने त्यांनाही लुबाडले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली. जगदीश प्रजापतीचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस